अमरावती : राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला प्रवासी वाहतूकीसोबतच प्रवासी वाहनांमधून आवश्यक आणि इतर वस्तू नेण्यास मंजूरी दिली. त्यानुसार महामंडळाने 21 मे पासून मालवाहतूकीस सुरूवात केली. मालवाहतुकीचे दर अत्यंत माफक असल्याने याकडे कल वाढत आहे. मालवाहतूकीच्या सेवेचा लाभ शेतकरी, व्यापारी, लघु व मोठे कारखानदार तसेच शासकीय, निमशासकीय खात्यांना देण्यात आला आहे. यातून आजवर महामंडळाने 68 लाखांची कमाई केली आहे.
महामंडळाने आतापर्यंत मालवाहतूक ट्रकद्वारे एकूण एक हजार 276 फेऱ्या चालविल्या आहेत. यात एकूण एक लाख 93 हजार 251 किलोमीटर वाहतूक झाली आहे. याम महामंडळाला 67 लाख 12 हजार रूपयांचे उत्पन्न झाले आहे. मालाची वाहतूक पुर्णत: सुरक्षित आणि वेळेत वितरण केल्या जात आहे. सुरक्षित आणि विश्वासार्ह वाहतुकीमुळे नागरिकांनी सेवा घेण्यास अनुकुलता दर्शविली आहे. सदरची सेवा ही 24 तास सुरू आहे.
कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडऊन जाहीर करण्यात आला. सामान्य प्रवाशाकरिता महामंडळाची वाहतूक काही अपवाद वगळता स्थगित करण्यात आली. 1 जूनपासून टप्प्याटप्प्याने अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली. मर्यादीत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आल्याने विभागास 2 ते 3 लाख रूपये उत्पन्न मिळाले. त्यानंतर 21 ऑगस्टपासून 50 टक्के प्रवासी क्षमतेने आंतरजिल्हा वाहतुकीस परवानगी देण्यात आली. त्यानंतर 18 सप्टेंबरपासून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानुसार अमरावती विभागातील सर्व आगाराची जिल्हा वाहतुक सुरळीत सुरू करण्यात आली. मात्र प्रवासी प्रतिसाद अत्यल्प असल्यामुळे 10 ते 12 लाख उत्पन्न मिळाले.
नाव्हेंबर महिन्यात दिवाळी सण असल्याने प्रवासी वाहतुकीस चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होण्यास सुरूवात झाली. त्यानुसार दररोज दिवाळीनंतर जवळपास 33 ते 34 लाख उत्पन्न झाले आहे. आंतरराज्य वाहतुकीमध्ये हैद्राबाद, खंडवा, भेापाळ, बऱ्हाणपूर, छिंदवाडा, बैतुल, मुलताई, पांढुर्णा अशा बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच आंतरजिल्हा वाहतुकीमध्ये नागपूर, पुणे, औरंगाबाद, नांदेड, परभणी, अंबेजोगाई, माहूर, मांडवी, लातूर, बीड, बुलढाण, चंद्रपूर, नाशिक, जळगांव अशा इतरही फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवासी वाहतुकीच्या अमरावती विभागामध्ये सरासरी एक हजार 76 फेऱ्या चालविल्या जात आहेत.
Related Stories
September 30, 2024