- मानवा तुला मानवाचा,
- देह दिला या निसर्गाने.
- सर्व प्राण्यांहून श्रेष्ठ असे
- स्थान दिले तुला या निसर्गाने
- निसर्गाने दिली बुद्धी तुजला
- सुविचार तो करण्यासी
- चांगले-वाईट काम आहे
- सारे हे जाणून घेण्यासी
- या बुद्धीचा वापर करुनी
- चांगल्याचा तू स्वीकार कर…
- “आहोत आम्ही मानव सारे,
- मानवा सारखा व्यवहार कर”…
- निंदा, वैर, द्वेष, इर्षा,
- यातच तू गुंतून राहतो
- मानवाच्या या धर्माला
- कलंक तू का लावतो.
- सुंदर करायचे असेल जीवनाला,
- तर प्रेमाचा स्वीकार कर.
- प्रेमाने राहून तू सर्वांशी
- या जीवनाचे कल्याण कर
- सत्य बोध हा घेऊन आता
- या जीवनाचा ‘उद्धार’ कर
- “आहोत आम्ही मानव सारे
- मानवा सारखा व्यवहार कर”…
- ऐकलंत का कधी प्राण्यांना,
- म्हणावं लागलं प्राणी बन.
- विचार याचा कर जरासा,
- शांत ठेवुन आपले मन.
- का म्हणावे लागते तुजला
- अरे माणसा ‘माणूस’ बन…
- आत्ता तरी दानवता त्यागून,
- माणसा तू ‘माणूस’ बन.
- मानवतेचा पाईक होऊन,
- मानवतेचा प्रचार कर.
- “आहोत आम्ही मानव सारे,
- मानवा सारखा व्यवहार कर”…
- – सिद्धार्थ कांबळे
- ई सेंट्रल