- मोकाट सुटली गाय
- रानात भटकते पाय
- पिल्लास जगविण्या
- झाली दुधावरी साय
- हपापलेली ही व्यवस्था
- बंदिवान मनाची अवस्था
- तोडली पाहिजे कायमची
- जगण्यासाठी कुव्यवस्था
- तळातील गाळ तळात राहिला
- विकासाने कागदी रकाना भरला
- बेकारीचं शिंगरू मेलं येरझारीनं
- अवघा गाव उपाशीच झोपला
- झोपण्याचे दिवस गेले
- जागण्याचे दिवस आले
- प्रकाश अंगणी पडला
- न्हावून मस्तक निघाले
- माणुसकीला पडले खिंडार
- विषमतेचे भरलेत भंडार
- बळी लटकतो फासावर
- गावात वाढताहेत खंडार
- जो तो शिक्षणाने हुशार झाला
- तरी सत्तेच्या दावनीला बांधला
- माणूस माणसापासून दूर चालला
- मानवतेचा पाझरही आटत चालला
- गुंता कुणा कळेना मनाचा
- सापाने घातल्या वेटोळीचा
- जगण्या-मरण्याचा निर्णय
- सोडवेना पाश पावलांचा
- गोठ्यातला बैल घोरतो
- दोन्ही बाजूने कड फेरतो
- मिळणार नाही खुट्यावरी
- दुष्काळ भूकेला घेरतो
- गाव तोडून फुगती शहरे
- फुटाचे भाव अंगावर शहारे
- ना मिळती मुली कृषकास
- कुवारेच राहतील का धुरे
- तळातील गाळ तळात राहिला
- विकासने कागदी रकाना भरला
- बेकारीचं शिंगरू मेलं येरझारीनं
- अवघा गाव उपाशीच झोपला
- बहुरुप्याची हौस मौज झाली
- अख्खी संपत्ती गहाण ठेवली
- घरात मृतांची रीघ लागली
- आम्ही मात्र काल ताटं पिटली
- सारे जहाँं से अच्छा देश हमारा
- आम्हास आमचा अजेंडा प्यारा
- लोकांना काय, बोलत असतात
- हमारा अंदाजही सबसे न्यारा
- अरुण विघ्ने
(छाया : संग्रहित)