भेदरलेल्या नजरा अन् भेदरलेले मनं।
सरता संपत नाही मानवाचं हे दुःख।।
देश शोकसागरात तरी नेते जल्लोशातं।
मानवता सोडून सारे केसाने गळा कापतातं।।
गयवरली धरती अन् गयवरलं आसमतं।
वेदनेच्या काळजानं अवघं विश्व तळपतं।।
धावणाऱ्या सदोदीत मानवाचं अख्ख आयुष्य थांबलेलं।
जैविक कोरोना महामारीनं
विश्वमनं आेथबलेलं।।
आरोग्य स्वः जीवनाचे सारे जपत जाऊ।
आलेल्या संकटाचा मिळून सामना करू।।
विश्वाच्या दुःखावरती हळूवार फुंकर घालू।
अन्यावरती लढण्यास एकसंघ
भारत करू।।
पानावल्या डोळ्यातील अश्रू न थांबतं।
दवाखाण्यातील जीवांचा आकांत न पाहतं।।
प्रकाशमान दिशांना राजकारण्यांनी केलं बंद।
काळाबाजारांनी औषधला केलं कुलूप बंद।।
आवाज बुलंद करूनी नेत्याला धडा शिकवू या ।
जन आक्रोश मनावर
मानवता कोरू या।।
– संदीप गायकवाड
नागपूर
९६३७३५७४००