- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील माजी सैनिक मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.यातील मुलांचे वसतिगृह नवसारी येथे जवाहर नवोदय विद्यालयाच्या मागे असून, त्यात 48 विद्यार्थ्यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था आहे. मुलींचे वसतिगृह भातकुली तहसील कार्यालयामागील नंदनवन कॉलनीत असून, त्यात 48 मुलींची राहण्याची व भोजनाची व्यवस्था आहे.
अमरावती शहराबाहेर राहणा-या माजी सैनिक व दिवंगत माजी सैनिकांच्या पाल्यांना या वसतिगृहात प्रवेश दिला जातो. माजी सैनिकांच्या मुलांकडून अत्यल्प शुल्क आकारले जाते. दिवंगत माजी सैनिकांच्या पाल्यांना विनामूल्य प्रवेश मिळतो. प्रवेश पुस्तिका वसतिगृह अधिक्षकांकडे उपलब्ध आहेत. तरी इच्छूकांनी अर्ज वसतिगृह अधिक्षकांकडे सादर करावा. अधिक माहितीसाठी नवसारी होस्टेलच्या (0721)2530366, मोबाईल क्रमांक 9970448088, नंदनवन कॉलनी होस्टेलच्या (0721) 2550429 मोबाईल क्रमांक 9890266004 किंवा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी (0721) 2661126 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
- (Images Credit : Pudhari)