(“मी जिजाऊ बोलते” या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण)
मोर्शी : येथील जीजामाता माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात दि.१२ जानेवारी २०२२ ला राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती प्राचार्या एम. डी.मुळे यांच्या अध्यक्षतेत शासनाच्या कोरोना निर्बधाचे पालन करुन संपन्न झाली.
प्रमुख अतिथी शैलेश ठाकरे,एस.व्ही.सवाई, जयंत सराटकर होते. अध्यक्ष व प्रमुख अतिथींनी राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून अभिवादन केले. या कोरोना काळात उपस्थितीची मर्यादा असल्यामुळे संस्थाध्यक्ष मा.सुहासराव ठाकरे,उपाध्यक्षा सौ.विमलाताई ठाकरे व सचिव विकासराव ठाकरे यांनी आँनलाईन अभिवादन करुन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी “मी जिजाऊ बोलते.” या एकपात्री प्रयोगाचे बहारदार सादरीकरण वर्ग १० वी च्या कु.रोषणी टेकाडे ने केले. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्या एम.डी. मुळे यांनी “माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद” यांच्या विचारांचे आजच्या समाजाने आचरण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.” याप्रसंगी शैलेश ठाकरे,जयंत सराटकर आणि प्रा.डी.बी.जावळे, बी.एन. भारती,के.एस. काळबांडे यांनी भाषणातून अभिवादन केले. “माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे जीवन व कार्य” या विषयावर विद्यार्थ्यांची भाषणं झाली. एस .व्ही. सवाई यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या विविध खेळ व क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.
विद्यार्थ्यांच्या पुष्पप्रदर्शनी, रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. निबंध स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी शैलेश ठाकरे,एस.व्ही.सवाई, जयंत सराटकर, कु.एस.जी.गाडगे, कु.जे.पी.पद्मने,ए.एम.गावंडे, कु.एस.वाय.अजमिरे कु.एस.एन. अर्डक.कु.व्हि.ई.कानबाले, प्रा.कु.यु.बी.ढोकणे,प्रा.आर.जी. कोटांगळे, प्रा. डी. बी. जावळे, बी.एन. भारती,श्रीमती के.एस. काळबांडे,डी.जी.केचे,कु.पी.एसविरखरे, कु.एस. एल.राठोड, पी. आर.पाटील, डी.ए.तंतरपाळे, एम.एन. गोमकाळे,एन.जी. चौधरी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता “राजमाता जिजाऊ” या वंदनगीताने करण्यात आली.