आमदार देवेंद्र भुयार यांची वनमंत्री संजय राठोड यांच्यासोबत सकारात्मक चर्चा !
वरुड : वरुड तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या महेंद्री जंगलाला राखीव संवर्धन क्षेत्र तसेच वनपर्यटन क्षेत्र म्हणून मंजुरी दर्जा देण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे केली आहे. त्यामुळे वरूड तालुक्याच्या वनवैभवात भर पडनार आहे.
वरूड वनपरिक्षेत्राचे १० हजार २०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र आहे. या जंगलालगत सातपुड्याच्या डोंगररांगा आहेत. वर्धा डायव्हर्शन सुपर एक्सप्रेस कॅनाल तसेच शक्ती, जीवना, चुडामणी, सोकी नद्या याच पर्वतातून तालुक्यात प्रवाहित होतात. भेमडी, झटामझिरी, शेकदरी, नागठाणा-१, नागठाण २, सातनूर, पुसली, वाई, पंढरी मध्यम प्रकल्प, पंढरी प्रकल्प असून, वाघ, बिबट, अस्वल, रोही, हरिण, रानडुकरांसारखे प्राणी या जंगलात आहेत. अनेक पक्षी, फुलपाखरांच्या प्रजाती आहेत. वनौषधी परिसर असून या जंगलामध्ये अनेक प्रकारची वृक्षे आहेत. १०८ वर्षांचे ऐतिहासिक विश्रामगृहसुद्धा आहे. यामुळे महेंद्री जंगलाला राखीव संवर्धन क्षेत्र तसेच वनपर्यटन क्षेत्र म्हणून मंजूर करावे अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी वानमंत्री संजय राठोड यांच्याकडे केली आहे.
महेंद्री जंगलाला जंगल संवर्धन राखीव क्षेत्र तसेच वन पर्यटनक्षेत्र म्हणून मंजुरीदेण्यासाठी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी वन मंत्री संजय राठोड यांच्याशी मंत्रालयात बैठक घेऊन महेंद्री जंगल संवर्धन राखीव क्षेत्र, वन पर्यटन क्षेत्र करण्यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली महेंद्री जंगलाचे वैभव, दुर्मीळ वनौषधी, वन्यजिवांची रेलचेल बघता, महेंद्री जंगल संवर्धन राखीव क्षेत्र तसेच वन पर्यटनक्षेत्र म्हणून मंजूर करण्यात येणार आहे.
तसेच महेंद्री जंगल हे पाणी देणारे जंगल असून महेंद्री तलावाचे भविष्य याच जंगलावर अवलंबून आहे. या परिसरात नागठाणा तलाव, वाई तलाव, जामगाव तलाव, पंढरी तलाव, एकलविहिर तलाव, शेकदारी तलावांचा महेंद्री जंगलात समावेश आहे.जंगलात असणाऱ्या जैवविविधतेमुळे वन्यजीवप्रेमी या जंगलाचे संवर्धन होण्याची अपेक्षा अनेक वर्षांपासून बाळगून आहेत. त्यांच्या स्वप्नाची पूर्तता आता होण्यास मदत होईल.
वरूड तालुक्यातील महेंद्री जंगलास जंगल संवर्धन राखीव क्षेत्र तसेच वन पर्यटनक्षेत्र म्हणून मंजुरी देण्यासाठी वनमंत्री संजय राठोड, आमदार देवेंद्र भुयार यांनी पुढाकार घेतला असून महेंद्री जंगल संवर्धन राखीव क्षेत्रासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश बैठकीमध्ये देण्यात आले. त्यामुळे येत्या काळात महेंद्रीचे जंगल संवर्धन राखीव क्षेत्र , वन पर्यटन क्षेत्र, म्हणून नावारूपास येणार आहे.
वनमंत्री संजय राठोड,आमदार देवेंद्र भुयार यांनी घेतला आढावा !
पर्यावरण, वने आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी महेंद्रीचे जंगल हे संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत वनमंत्री संजय राठोड आमदार देवेंद्र भुयार यांनी याबाबत मंत्रालायमध्ये बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी महेंद्री जंगलाचे वैशिष्ट्ये, वनसंपदा, जलस्त्रोत, वन्यजिवांचा वावर, क्षेत्रफळ याविषयी वनमंत्री संजय राठोड यांना माहिती देऊन महेंद्रीचे जंगल संवर्धन राखीव क्षेत्र तसेच वन पर्यटनक्षेत्र म्हणून मंजूर करण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी केली आहे .
Related Stories
November 28, 2023
November 27, 2023
November 27, 2023