अमरावती : महाराष्ट्र साहित्य सप्तरंगी समूहात ५ सप्टेंबर २०२१ रविवारला शिक्षक दिनानिमित्त ऑनलाईन कविसंमेलनाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य सप्तरंगी मंचच्या समूह प्रशिसिका सौ निशा खापरे नागपूर यांनी केले होते. या ऑनलाईन कविसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले व्याकरणाचार्य मा. चारुदत्त मेहरे यांनी आपल्या मनोगतात व्याकरणाने दिलेले आणि शिक्षण साहित्य मंडळाने मान्यता मिळालेले जे काव्याचे प्रकार आहे त्यानुसार आपले काव्यलेखन करावे कुठल्याही कुणीही काढलेल्या नवीन प्रकार शिकण्याच्या मागे लागू नये असा मोलाचा संदेश दिला. तसेच सोपी आणि लयीत बसणारी अष्टाक्षरी रचना लिहा असे ही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष डॉ भणगे शैलेंद्र यांनी कोरोना काळात आज आपण सर्व ऑनलाईन भेटत असलो तरी लवकरच या समूहाचे ऑफलाईन कविसंमेलन घेऊन प्रत्येक्ष सर्व ऑफलाईन कविता सादर करूया असे मत व्यक्त केले. या ऑनलाईन कविसंमेलनाचे सूत्रसंचालन अगदी लाघवी आणि ओघवत्या भाषेत करून कार्यक्रमाला एका उंची वर नेण्याचे काम संध्याराणी कोल्हे उस्मानाबाद यांनी केले. कविसंमेलनाचे उद्घाटन सावित्री माईच्या फोटोला दीपप्रज्वलन करुन सौ सोनाली सहारे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली सुमधुर आवाजात स्वागत गीत सोनाली सहारे यांनी गायले. अतिथी परिचय सौ संध्या भोळे भुसावळ यांनी दिला. अतिशय सुंदर आभार प्रदर्शन छाया गुलाबराव पाटील डहाणू पालघर यांनी केले. या कविसंमेलनात श्री प्रमोद भागवत चांदुर रेल्वे, श्री आशिष दाभाडे मातोळा, श्री वसंत ताकधड चंद्रपूर, सौ हर्षा वाघमारे नागपूर, सुषमा कळमकर नागपूर, प्रतिभा केदार पवार बहाद्दरपूर, सरिता कलढोणे जुन्नर, संगीता महाजन जळगाव, संध्या भोळे भुसावळ, छाया पाटील डहाणू पालघर, संध्याराणी कोल्हे उस्मानाबाद, सौ सोनाली सहारे ब्रम्हपुरी मा.चारुदत्त मेहरे तेल्हारा, डॉ भणगे शैलेंद्र औरंगाबाद, सौ निशा खापरे नागपूर, या सर्व मान्यवर कवींनी अतिशय सुंदर कविता सादर करून शिक्षक दिन साजरा केला. आपल्या गुरुप्रती आदर आणि भावना व्यक्त करणारा हा सोहळा रोज शब्दांनी समूहात भेटणारे सर्व स्वारस्वत या ऑनलाईन कविसंमेलनाच्या निमित्याने प्रत्येक्ष भेटले.. आणि हा कविसंमेलनाचा सुंदर सोहळा संपन्न झाला असे समूहाच्या संचालक आणि कार्यक्रमाच्या आयोजक सौ निशा खापरे यांनी सांगितले.
Related Stories
October 10, 2024