भोपाळ : महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये येणार्या व मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रात जाणार्या बससेवेवरील बंदी मध्य प्रदेश सरकारने ३0 एप्रिलपयर्ंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. याशिवाय, मध्य प्रदेश सरकारने भोपाळ, इंदौर, जबलपूर, बैतुल, छिंदवाडा, खरगोन आणि रतलाम येथील शाळा व महाविद्यालये १५ एप्रिलपयर्ंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या अगोदर महाराष्ट्र बससेवेद्वारे सुरू असलेली प्रवासी वाहतूनक २१ ते ३१ मार्चपयर्ंत बंद करण्यात आलेली होती. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यांनी नागरिकांना मास्कचा वापर व सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सध्या तरी लॉकडाउनचा कुठलाही विचार नसल्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलेले आहे. मध्य प्रदेशमध्ये करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काही कडक निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र व मध्यप्रदेशमधील बस सेवेवरील बंदीचा कालावधी देखील वाढवण्यात आला आहे.
Related Stories
October 14, 2024