नवी दिल्ली, : सन 2022 च्या “केंद्रीय गृहमंत्री तपासात उत्कृष्टता पदकां”ची घोषणा करण्यात आली. पदक विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील 11 पोलीसांचा समावेश आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सन 2022 साठी उत्कृष्ट तपासासाठीचे “केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्टता तपास पदक” (Union Home Minister’s Medal for Excellence in Investigation ) आज जाहीर करण्यात आले. देशभरातील एकूण 151 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. या पुरस्काराची सुरुवात सन 2018 पासून करण्यात आली. यावर्षी महाराष्ट्रातील 11 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना “केंद्रीय गृहमंत्री पदक उत्कृष्टता तपास” जाहीर झाले आहेत.
राज्यातील पोलीसांमध्ये कृष्णकांत उपाध्याय, उप पोलीस आयुक्त, प्रमोद भास्करराव तोरडमल, निरीक्षक, मनोज मोहन पवार, सहा. पोलीस निरीक्षक, दिलीप शिशुपाल पवार, निरीक्षक, अशोक तानाजी वीरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ), अजित भागवत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ), श्रीमती राणी तुकाराम काळे, सहा. निरीक्षक, दिपशिखा दिपक वारे, निरीक्षक, सुरेशकुमार नानासाहेब राऊत, निरीक्षक, जितेंद्र बोडप्पा वनकोटी, निरीक्षक, समीर सुरेश अहिरराव, निरीक्षक यांचा समावेश आहे.
यासह केंद्रीय अन्वेषण ब्यूरो ( सीबीआय)चे 15, मध्य प्रदेशमधून 10 पोलीस अधिकारी – कर्मचारी, उत्तर प्रदेशातून 10 पोलीस अधिकारी – कर्मचारी, केरळमधून पोलीस 8, राजस्थानमधून 8 पोलीस , पश्चिम बंगालमधून 8 आणि उर्वरित राज्यांमधून तसेच केंद्रशासीत प्रदेशातून पोलीस आहेत. 28 महिला पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.