मुंबई : महानायक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांच्या संख्येची मोजदाद करणं केवळ अशक्य आहे. ते स्वत: प्रचंड शांत स्वभावाचे असल्याने चाहते त्यांच्याकडे आकर्षित होत असतात. तर कधीकधी बिग बी मस्ती करण्याच्या मूडमध्ये असतात.
त्यांचे चाहते नेहमीच त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. अमिताभ यांच्या घराबाहेरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. कारण, व्हिडिओमध्ये अमिताभ यांच्या घराबाहेर पोलीस उभे असल्याचे दिसत आहे. अमिताभ यांच्या घराबाहेरचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर वायरल होत आहे. ज्यात, तिथे पोलिसांचा एक मोठा ताफा उभा असल्याचं दिसतं. बिग बींच्या सुरक्षेसाठी हे पोलीस तैनात करण्यात आल्याचं म्हटलं जातंय. परंतु, या सुरक्षेमागचं खरं कारण मात्र कोणालाही माहीत नाही.
असं म्हटलं जातंय की, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना मुंबईत चित्रपटाचं चित्रीकरण न होऊ देण्याबद्दल धमकी दिली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर जलसाच्या बाहेर पोलिसांकडून हा बंदोबस्त करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर, नाना पटोले यांचं एक वक्तव्य समोर येतंय. ज्यात त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटलं, मी जे काही म्हटलं ते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या विरोधात नाही तर त्यांच्या कामाच्या विरोधात होतं. ते खरे हिरो नाहीत. जर ते असते, तर ते लोकांच्या समस्या सोडवायला सगळ्यात पुढे उभे असते.
जर त्यांना कागदी वाघ बनायचे असेल तर मला काहीचं अडचण नाही. आम्ही मागे हटणार नाही. जेव्हा जेव्हा त्यांचे चित्रपट प्रदर्शित होतील तेव्हा आम्ही काळे झेंडे घेऊन आमचा विरोध दर्शवू. आम्ही गोडसेच्या विचारसरणीने चालणारे नाही, तर गांधीजींच्या विचारांचे पालक आहोत. मुंबई पोलिसांकडून याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. परंतु, या सर्व प्रकारामुळे अमिताभ यांचे चाहते मात्र चिंतीत झाले आहेत.
Contents
hide
Related Stories
December 8, 2024
December 8, 2024