- दिनदुबळ्यांच्या जखमेवर
- लावण्यासाठी मलम
- दुखऱ्याचे अश्रू पुसण्या
- हाती घेतली तुम्ही कलम
- मानव जातीच्या धर्माचे
- समजून गेले जेव्हा वर्म
- तेव्हाच तुम्ही निर्मिला
- सार्वजनिक सत्य धर्म
- स्त्रियांच्या अज्ञानाच्या
- जाणवल्या जेव्हा कळा
- तेव्हा तुम्ही चालू केली
- मुलींसाठी पहिली शाळा
- कोण शिकवणार मुलींना
- जाणवली तुम्हाला कमी
- सावित्रीला तयार करून
- मशाल पेटवण्याची हमी
- आज तुझ्या लेकींनी बाबा
- व्यापून काढले सारे क्षेत्र
- तुम्ही दिलेली शिकवण
- अन् वापरून महा अस्त्र
- शेतकऱ्यांचे दुःख वेदना
- संवेदना झाल्या आखूड
- गुलामीच्या तिव्र जाणिवेने
- चालवला तुम्ही आसूड
- पी के पवार
- सोनाळा बुलढाणा
- ९४२१४९०७३१