अमरावती : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे उद्या (24 ऑक्टोबर) रोजी अमरावती जिल्ह्यात आगमन होत आहे.
त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : सकाळी 9 वाजता नागपूर येथून मोटारीने अमरावतीकडे प्रयाण, सकाळी 11.30 वाजता हॉटेल ग्रँड महफिल येथे माजी राज्यमंत्री सुनील देशमुख यांच्याकडील लग्नसमारंभास उपस्थिती, दुपारी 12.30 ते 1.30 राखीव, दुपारी 1.45 ते 2.15 शासकीय विश्रामगृह अमरावती येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नवनियुक्त संचालकांचा सत्कार कार्यक्रम, दुपारी 2.15 ते 3 वाजता शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे राखीव, दुपारी 3 वाजता अमरावती येथून मोटारीने नागपूरकडे प्रयाण.