अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाचे माननीय आमदार श्री किरणराव सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या सत्कार सोहळ्यात मराठी भाषा संवर्धन संस्थेच्या साहित्यसेवा पुरस्काराने प्राध्यापक, ललित लेखक, श्री विजय पराते यांना सन्मानित करण्यात आले तर, मराठी भाषा संवर्धन संस्थेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने मुख्याध्यापक श्री नामदेव गोपेवाड यांना सन्मानित करण्यात आले.
दिनांक 30 सप्टेंबर ला पार पडलेल्या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार माननीय श्री किरणराव सरनाईक* साहेब होते.तर प्रमुख अतिथी म्हणून ढाणकी नगरपंचायतचे नगराध्यक्ष श्री सुरेश जयस्वाल, युवक मंडळ पुसदचे सचिव श्री विजयभाऊ जाधव, माजी शिक्षणाधिकारी श्री रंगरावजी काळे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्री लक्ष्मीकांत रावते, मराठी भाषा संवर्धन संस्थेचे संस्थापक राज्याध्यक्ष श्री सुरेश पेंढरवाड, बिटरगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री भोस, उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष श्री बाळू पाटील चंदरे, स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री गवई, माजी मुख्याध्यापक श्री बल्लाळ सर, डॉक्टर कवडे, ऍडओकेट शेख अन्सार, भाजपचे ढाणकी शहराध्यक्ष श्री रोहित वर्मा, नगरसेवक श्री संतोष पुरी, नगरसेवक संबोधी गायकवाड, वैशाली शडमाके मॅडम, पदमावार मॅडम, चंदरे मॅडम,चव्हाण सर, मोटाळे सर ,ठाकरे सर, वैभव मांडवगडे सर, राठोड सर, चांदेकर सर,काईट सर,सुनील राठोड सर, मार्कंडे मॅडम ,राठोड मॅडम, विजय खंदारे , स्वप्नील चिकाटे, नागेश मिराशे, गजानन मस्के,दिनेश सोनुने, संतोष तिरमकदार, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व माजी विध्यार्थी यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा पार पडला.