अमरावती : अमरावती महानगरपालिकेत प्रजासत्ताक दिनाचा ७१ वा वर्धापन दिन महापौर चेतन गावंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन साजरा करण्यात आला. मंगळवार दिनांक२६ जानेवारी,२0२१ रोजी अमरावती महानगरपालिकेच्या प्रांगणात सदर ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी ठिक ८.१५ वाजता घेण्यात आला. यावेळी उपमहापौर कुसुम साहु, मनपा आयुक्त प्रशांत रोडे, सभागृह नेता सुनिल काळे, विरोधी पक्षनेता बबलु शेखावत, गटनेता चेतन पवार, झोन सभापती नुतन भुजाडे, झोन सभापती वंदना कंगाले, शहर सुधार समिती सभापती अजय गोंडाणे, नगरसेवक विलास इंगोले, संजय नरवणे, तुषार भारतीय, सलीम बेग, राजेश साहु, बलदेव बजाज, नगरसेविका संध्या टिकले, पद्मजा कौंडण्?य, जयश्री डहाके, जयश्री कु-हेकर, अनिता राज, लविना हर्षे, इंदुताई सावरकर, वंदना हरणे, स्वाती कुलकर्णी, उपआयुक्त सुरेश पाटील, अमित डेंगरे, मुख्यलेखाधिकारी हेमंत ठाकरे, अतिक्रमण पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी महापौर चेतन गावंडे यांनी भारताच्या ७१व्या प्रजासत्ताक दिनाच्या मंगलमय प्रसंगी, अमरावतीच्या जनतेला व उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या. भारताची प्रादेशिक एकात्मता जोपासतांना आणि कायदा व सुव्यवस्था राखतांना ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा शूर हुतात्म्यांना त्यांनी आदरांजली वाहली.महापौरांनी आपल्या शुभेच्छा देतांना सांगितले की, देशाच्या जडणघडणीत आणि विकास प्रक्रियेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाना योग्य ते स्थान मिळवून देण्यासाठी १९९२/९३ मध्ये ७३ व ७४ वी घटना दुरुस्ती करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक स्थान प्राप्त करून देणार्या ऐतिहासिक घटना दुरुस्तीत २८ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका स्थापन होऊन आज ३७ वर्ष पूर्ण झाले आहे.प्रगतीशील अमरावतीची नवी जडणघडण हे आवाहन सामोरे ठेवूनच महानगरपालिकाचे कामकाज सुरू आहे. अमरावतीतील जनतेच्या सेवेची संधी एक निरपेक्ष व सामाजिक बांधिलकीचा आविष्कार ठरावा या हेतूने मनपामध्ये नवे पायंडे, नवे माप, नव्या योजनांचे निर्णय जनतेसाठी घेत आहे.साथीच्या प्रकारातील या विषाणूचा प्रादूर्भाव जगभरातील अनेक श्रीमंतापासून ते गरीबापयर्ंत झाला. जोपयर्ंत या विषाणूचे स्वरूप, त्याचा प्रसार आणि व्याप्ती याचा ताळेबंद घालायच्या आताच या विषाणूने मोठ्या प्रमाणात पसरायला सुरुवात केलेली होते. आता या आजारावर लस बनवण्यात शास्त्रज्ञांना यश आले. अश्या बिकट परिस्थितीमध्ये सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांनी रस्त्यावर उतरून काम केले. मालमत्ता करावरील शास्तीत ८0 टक्के सवलत, स्वच्छ सर्वेक्षण २0२0 अभियान मध्ये देशात ३७ आणि महाराष्ट्रमध्ये १0 व्या क्रमांक, शिक्षण, महिला व बाल कल्याण, समाज विकास विभागाच्या कल्याणकारी योजना, शिवटेकडी, भीमटेकडी, छत्रीतलाव सौंदर्यकरण, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, नागरिकांना मूलभूत सुविधा निर्माण करणे असे अनेक काम प्रगतीपथावर आहे. स्वच्छ व पारदश्री कारभार करिता वचनबद्ध आहोत.आजच्या या दिवशी आपण आपल्या संविधानाने घालून दिलेले आदर्श व मूल्ये यांच्याप्रती असलेली आपली बांधीलकी दृढ करूया आणि एक बळकट व समृद्ध अमरावती घडवण्याचा प्रयत्न करूया असे यावेळी महापौर चेतन गांवडे यांनी सांगितले.
Related Stories
December 7, 2023