- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : लेखिका सौ.शोभा वागळे,मुंबई यांच्या ‘मन:स्पर्शीत’ या कथा संग्रहाचा प्रकाशन समारंभ दि.२६ जून २०२२ रोजी पुणे येथे संपन्न झाला. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शोभा वागळे यांच्या ज्येष्ठ भगिनी,गोवा येथील सौ. राधाताई कामत होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कवी, लेखक,गझलकार प्रा.श्री.शांताराम हिवराळे,पुणे हे होते. प्रकाशक संस्थेच्या वतीने काव्यानंद मासिकाचे संपादक श्री. सुनिल खंडेलवाल हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्वलित करून झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी, गझलकार श्री.प्रणव बनसोडे यवतमाळ यांनी केले. या वेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. साईश प्रकाशन च्या वतीने सुनिल खंडेलवाल यांनी लेखिका शोभा वागळे यांचा सत्कार केला. मान्यवरांनी या प्रसंगी समयोचीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात रसिक वाचक मान्यवरांनी ऑनलाईन, ऑफलाईन माध्यमाद्वारे आपली उपस्थिती लावली. प्रकाशनाचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाल्यावर अनेकांनी शोभा ताईंना प्रकाशनाबद्दल अभिनंदन करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सांगता कवी कवीराज विजय सातपुते यांनी आपल्या अप्रतिम मनोगताने केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.वचना व सुहास प्रभू यांनी विशेष परिश्रम घेतले.