मुंबई : मध्य रेल्वे ही भारतीय उपखंडातील अग्रगण्य रेल्वे आहे. मध्य रेल्वेने पर्यावरण संवर्धनातही पुढाकार घेतला आहे आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध पावले उचलली आहेत. कार्यस्थळे आणि रेल्वे परिसर स्वच्छतेचा प्रचार आणि खात्री करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी विविध उपायांचा अवलंब केल्यामुळे मध्य रेल्वेने ६ व्या राष्ट्रीय रेल्वे पुरस्कार २0२१ मध्ये प्रतिष्ठित ह्यपर्यावरण आणि स्वच्छता शिल्ड पुरस्कार जिंकला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नागपूर व सोलापूर स्टेशन तसेच कल्याण येथील सेंट्रल रेल्वे स्कूल व वर्कशॉप युनिटसारख्या इतर युनिट्सना आयजीबीसी सुवर्ण प्रमाणपत्र मिळाले आहे.
भारतीय रेल्वेवरील सर्वाधिक ८७ इको-स्मार्ट स्थानके मध्य रेल्वेत आहेत. डिसेंबर २0२१ पयर्ंत ८७ टक्के इको स्मार्ट स्टेशन्सना आयएसओ प्रमाणपत्र मिळवून देण्यातही मध्य रेल्वे यशस्वी झाले आहे. (सध्या ८७ पैकी ७६ इको स्मार्ट स्टेशन आयएसओ प्रमाणित आहेत). मध्य रेल्वेने राज्य/केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जल कायदा आणि वायु कायद्यांतर्गत मध्य रेल्वेच्या ८७ इको-स्मार्ट स्थानकांपैकी ७४ स्थानकांसाठी संमती मिळवली आहे. अशाप्रकारे प्रदूषण नियमांचे पालन करून समाधानकारक गुण मिळविण्याच्या दृष्टीने अत्यंत कठीण काम केले आहे.