अमरावती : अमरावती शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार यात वाढ होत असून कोरोना विषाणूमुळे होणारा कोविड १९ आजाराबाबत अमरावती महानगरपालिका क्षेत्रात दक्षता घेण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात असून त्यादृष्टीने दि. १५ फेब्रुवारी रोजी महापौर चेतन गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-१९ संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मनपा आयुक्त प्रशांत रोडे, उपआयुक्त रवि पवार, बाजार व परवाना अधिक्षक उदय चव्हाण, व्यापारी संघटनेतील महेश पिंजानी, जयंत कमदर, प्रशांत अग्रवाल, अर्जुन चंदवानी, मुकेश सराफ, अशोक राठी, संजय छांगाणी, सुदेश जैन, ओमप्रकाश चांडक, प्रकाश बोके, आत्माराम पुरस्वार, घनश्याम राठी, विनोद साम्रा, गोविंद सोमानी, मनोज खंडेलवाल, योगेश रतानी, बादल कुळकर्णी, सुरेश जैन उपस्थित होते. महानगरपालिका परिक्षेत्रात कोरोनाबांधीतांची संख्?या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे गांर्भीय ओळखून सर्वांनी दक्षता त्रिसूत्री (मास्क वापर, सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर) पाळली नाही तर पुन्हा लॉकडाऊनची वेळ येवू शकते. हा धोका वेळीच ओळखावा व सर्वांनी दक्षता त्रिसुत्री पाळावी असे आवाहन करतांनाच महापौर चेतन गावंडे यांनी दक्षता न पाळणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला आज येथे दिले. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पाश्वभूमीवर महापौरांनी गंभीर दखल घेत व्यापा-यांची बैठक घेतली. अमरावती शहरातील बाजारपेठा नियमाचे पालन करत नसेल तर अश्या सर्व बाजारपेठांवर दंडात्मक कार्यवाही तसेच सिल करण्याची कार्यवाही सुरु करण्याचे सक्त निर्देश या बैठकीत देण्यात आले. मंगल कार्यालया नियमाचे पालन होत नसल्यास अश्या मंगल कार्यालयाविरुध्द व आयोजकावर दंडात्मक कार्यवाही करावी. ज्या भागात, कार्यालयात, व्यापारी प्रतिष्ठांने, मॉल, इत्यादी ठिकाणी कोविड रुग्ण आढळल्यास तेथील संबंधीतांचे स्वॅब घेण्यात यावे. गर्दीच्या ठिकाणी दंडात्मक कार्यवाहीसाठी पथके पाठविण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. तसेच कपडे मॉल मध्ये कपडे ट्रायल व बदलवणे यावर प्रतिबंध करावे तसेच थर्मलगन व सॅनिटायझरचा वापर करावा. या बैठकीत महापौर चेतन गावंडे यांनी यावेळी सांगितले की, कोरोना विषाणू संक्रमण वाढणार नाही या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. कालची परिस्थिती, आजची स्थिती व भविष्यातील परिस्थिती या संपुर्ण घटनाक्रमावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. व्यापारी यांना थर्मल स्कॅनिंग करणे शक्य असेल ग्राहकाचे तर करावे जेणेकरुन ज्यांना टेंम्प्रेचर असेल त्यांना प्रवेश टाळता येईल. शहरातील लॉन, मंगल कार्यालय, सार्वजनिक, खाजगी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात तसेच मंगल कार्यालयामध्ये ५0 पेक्षा जास्त नागरीक असतील तर त्यांच्यावर प्रति व्यक्ती ५00 रुपये दंड आकारण्याबाबत यावेळी महापौरांनी बाजार व परवाना विभागाला कार्यवाही करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले. महापौर चेतन गावंडे यांनी सर्व नागरीकांनाही आवाहन केले की, ताप, खोकला, श्वसनाचे विकार आदी कुठलाही त्रास जाणवत असल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी. इतर कुणालाही असे आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे. घाबरून न जाता दक्ष राहावे असे आवाहन महापौर चेतन गावंडे यांनी केले आहे. ं
Related Stories
December 2, 2023