पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेला मंगळवारपासून सुरूवात होत आहे. उभय संघातील ही मालिका पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघाने याअगोदर कसोटी व टी-२0 मालिकेत इंग्लंडला पराभूत केले आहे आणि आता त्यांचा प्रयत्न एकदिवसीय मालिकेवरही कब्जा करण्याचा असणार आहे. तर इंग्लंडचा प्रयत्न एकदिवसीय मालिका जिंकून दौर्याचा शेवटचा गोड करण्याचा असणार आहे.
भारत-इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण १00 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. यात भारतीय संघाने ५३ सामन्यात विजय मिळवला आहे. तर इंग्लंडने ४२ सामन्यात बाजी मारली आहे. तर २ सामने बरोबरीत सुटले आहेत. याशिवाय राहिलेल्या ३ सामन्याचा निकाल लागलेला नाही. ही आकडेवारी पाहिल्यास भारतीय संघाचा परडे जड असल्याचे दिसून येते.
इंग्लंडने भारतात, भारताविरुद्ध ४८ एकदिवसीय सामने खेळली आहेत. यातील ३१ सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. तर १६ सामन्यात त्यांना विजय साकारता आला आहे. तर एक मॅच टाय झाली होती. ही आकडेवारी पहिल्यास भारतीय संघ मायदेशात असल्याचे दिसून येते. उभय संघात पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये फक्त एक एकदिवसीय सामना झाला आहे. १५ जानेवारी २0१७ रोजी झालेल्या या सामन्यात भारताने ७ गडी राखून विजय मिळवला होता. विशेष म्हणजे इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या ३५१ धावांचे आव्हान भारताने ११ चेंडू राखत ३ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले होते.
Contents
hide
Related Stories
December 3, 2024