अमरावती प्रतिनिधी :भारतीय विद्यामंदिर अमरावतीद्वारा संचालित भारतीय महाविद्यालय अमरावती व अमरावती महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय सेवा योजना,शारारिक शिक्षण व क्रीडा विभागाद्वारा आयोजित कोरोना लसीकरण शिबिर संपन्न झाले.
सर्वप्रथम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आराधना वैद्य यांच्या हस्ते डॉ.खान व आरोग्य विभागाच्या सर्व चमूचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आला. प्रमुख अतिथी,प्रा. नीलेश कडू जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. याप्रसंगी डॉ विजय भांगे, डॉ. संगीता देशमुख, डॉ. विक्रांत वानखडे, प्रा. पंडित काळे , डॉ. नितीन तट्टे, डॉ.विनोद कल्यामवार, डॉ. सुमेध वरघट, डॉ. प्रशांत विघे कार्यक्रम अधिकारी,राष्ट्रीय सेवा योजना हे उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार कोरोच्या नियंत्रणापासून मुक्ती मिळण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून या शिबिराचे आयोजन करण्यात आला असल्याचे डॉ.प्रशांत विघे म्हणाले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वेश पिंपळे, अच्युत वानखडे, सर्वधर्मीय रितेश दामले, अभिजीत कोरे पाटील, अभिजीत भेंडे, आदित्य काकडे, नीरज जसुतकर, सौरभ इंगळे, तुषार कळंबे, आदेश नंदा, अनिकेत मस्के, पवन वैद्य आदी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी सहभागी झाले.
—–