अमरावती : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे सन 2020-21 व 2021-22 वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील नवीन व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेस पात्र विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक 31 डिसेंबर 2021पर्यंत आहे.
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, अमरावती या कार्यालयातून अर्ज प्राप्त करून परिपूर्ण अर्ज भरून विहित वेळेत सादर करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील. विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्रीमती माया केदार यांनी केले आहे.