Skip to contentओढीता भाता सोडीतो वारा, जळे कोळसा लाल अंगारा
लोखंड तापे इंगोळावर, होई घणाचा त्यावर मारा !
भिजते चोळी वाहती धारा, गरमीचा तो गरम फवारा
नाक तोंडाने सुई सुई करतो, लोखंड फिरवित तो म्हातारा !
पोटामध्ये आग भुकेची, डोळ्यापुढती उभी आग ती
घण मारता गरगर वाके, लोखंडाला येई जाग ती !
Post Views: 71
Like this:
Like Loading...