- वर्षानुवर्षे येणारी दीप दिपावली
- आजच्या वर्षी दीनवाणी झाली
- कोरोनाने सार्याची वाट लावली
- हर्ष उल्हासात येणारी भाऊबीज
- सुकल्या नेत्रातच कोमेजली. …१ …
- बहारदार पेहराव शरीर आडदांड
- बघता बघता जळून गेला पिंड
- भाऊ बहिणींचं बंधन संपवून रात गेली
- नियतीला नाही भाऊबीज समजली
- मम ममतेची पाखर मनातच कोमेजली. .२ ..
- भाऊ माझा पाठीराखा आधार जन्मभराचा
- साडी चोळी अलंकार आता संपला माहेरीचा
- एकलाच होता तो एकटाच निघून गेला
- सार्या आयुष्याच्या आठवणी ठेवून गेला
- देखणी मूर्ती त्याची फोटोतच विसावली .. ३ ..
- दीवाळीचा दीप त्यांच्या फोटोपुढे लावला
- पणतीच्या प्रकाशाने चेहरा त्याचा उजाळला
- माझ्या भाऊबीजेचा सोहळा अपुराच राहिला
- संपली भाऊबीज आता चंद्र आहे साक्षीला
- शीतल छायेत ही काया माझी कोमेजली
- भाऊबीज कोमेजली
- -जयद्रथ आत्माराम आखाडे
- रा. त्रिवेणी नगर तळवडे
- पोष्ट रुपीनगर तालुका हवेली जिल्हा पुणे.
—–