बळं आणुनी पंखात
झेप नवी आकाशी
झेल कष्टाची ही रात
तुझं खेचाया उठती
मागे हे हजारो हात
खंत तुला न व्हावी ती
होऊ दे कितीही घात
ध्यास असावा खास
मनी असा निश्चयाचा
सदा वसू दे विश्वास
ऱ्हास हो पराजयाचा
अंगी कौशल्य लाभले
विष ही पचवण्याचे
घात शत्रूंचे साधले
बस अजाणतेपणाचे
वार पाठीत करणे
हौस कुणाची ही आहे
शोभे बिल्लोर मनगटी
कपट्यांचे काम आहे
सौ. शितल राऊत
अमरावती