अंधार दाटला मृत्यूचा
जिंदगीच उरली नाही
आता होता कसा गेला
भय इथे संपत नाही ।।
अंधार काळ रात
डोळ्यात निघून गेली
आक्रोश आसवांत
सरणात लीन झाली ।।
सांगू कुणाला वेदना
मृत्यूचे तांडव पाहून
मुक्या झाल्या जखमा
विरहाचे गीत गाऊन ।।
शास्वती जिंदगीची
शून्यवत झाली
मुरद्यांच्या सोबतीने
मज जग आली ।।
म्हणतात सगळे
हे माझे माझे
सोडून नकळत जाती
जीवनाचे ओझे ।।
* राजेंद्र क. भटकर
बडनेरा