मुंबई : खासदार आणि बंगालच्या अभिनेत्री नुसरत जहाँ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. निखिल जैनपासून विभक्त होऊन मुलाला जन्म दिल्यापयर्ंत अनेक गोष्टींमुळे त्या चर्चेत राहिल्या आहेत. त्यानंतर आता नुसरत जहाँ बोल्ड अवतारातील फोटो पोस्ट केल्याने पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यांचा हा बोल्ड फोटो पाहून अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे.
नुसरत जहाँ यांनी बुधवारी (८ डिसेंबर) संध्याकाळी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी दोन थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. यातील दोन्ही फोटोत नुसरत यांनी स्पोर्ट्स ब्रा परिधान केल्याचे दिसत आहे. त्यासोबतच त्या दोन्हीही फोटोत त्यांनी ओले केस मोकळे सोडल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोला आर्काइव्हमधून असे कॅप्शन दिले आहे. तसेच या फोटोला थ्रोबॅक असा हॅशटॅगही त्यांनी दिला आहे.
त्यांनी दिलेल्या कॅप्शनवरुन नुसरत यांचा हा जुना फोटो असल्याचे बोलले जात आहे. नुसरत जहाँ यांनी हा फोटो पोस्ट केल्यानतंर अनेकांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत. नुसरत यांच्या बहुतांश चाहत्यांनी फायर, हार्ट, स्माईल यासारख्या इमोजींचा वापर करत कमेंट केली आहे.
तर काही नेटकर्यांनी या फोटोवरुन नुसरत जहाँ यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. देशाच्या तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांचे काल तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. त्यामुळे देश दु:खी आहे आणि दुसरीकडे देशाच्या खासदार र्शद्धांजली अर्पण करायची सोडून थ्रोबॅक फोटो पोस्ट करत आहेत, अशी कमेंट एका नेटकर्याने केली आहे. तर एकाने या आपल्या खासदार, ज्या नेहमी फोटोग्राफी करण्यात व्यस्त असतात, अशी कमेंट केली आहे. तर एका नेटकर्याने तुम्ही खासदार आहात, र्मयादेचे पालन करा, असा सल्ला तिला दिला आहे.