रक्तबंबाळ झाल्यात
तव बोधिवृक्षाच्या फांद्या
पानांपानावर
लिहिलेल्या
शांती अहिंसा करुणा
मैत्रिभावना
रडताहेत ढसाढसा
खालच्या माणसांच्या
उत्थानासाठी ……
तथागता
तू पेरून ठेवली
इथल्या मातीत
समतेची फांदी
ती मुळासकट
नष्ट कराया येथील
मनूच्या पिलावळीने
पेरून ठेवला सुरुंग…..
तथागता
तू पेरलेस विज्ञान
तरीही कळलाच
नाही आम्हा बुद्ध
तुझा तो
अत्त दीप भव
स्वयंम दीप भव
अन घोषित केलंय तुला
मुक्तीदाता मोक्षदाता ……
तथागता
प्रज्ञा शील करणेची
शाल पांघरून
भटकताहेत
तुझी लेकरं
शोधताहेत तू दिलेला मार्ग
बोधिवृक्षाच्या
सावलीत…….
– राजेंद्र क. भटकर
बडनेरा