उजेड ज्ञानाचा पाहिला,
या वैशाखी पौर्णिमेला,
बुध्दाचा जन्म झाला ||१||
महामाया देवी मातेस,
सिध्दार्थ पुत्र झाला,
राजा शुध्दोधनाचा,
राजकुमार जन्मा आला ||२||
सजली कपिल वास्तु,
फुल तोरण, माळांनी,
नटली नगरी शाक्यांची,
लाख,लाख,दिव्यांनी ||३||
नामकरण विधी सोहळा,
सजला शाक्य कुळात,
सप्त ब्राह्मण आले,
नाम ठेवण्यास गृहात ||४||
नाम ठेविले युवराज सिध्दार्थ,
माता,पितास झाला हर्ष,
बुध्दाच्या जन्माची उमटली पाऊले,
या भारतभुवरी झाला ज्ञानाचा स्पर्श ||५||
– प्रविण खोलंबे.
मो.८३२९१६४९६१