- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : आदिवासी समाजक्रांतीचे जनक आद्य क्रांतिवीर बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज उपायुक्त संजय पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त गजेंद्र बावणे, श्यामकांत मस्के, सहाय्यक आयुक्त विवेकानंद काळकर, तहसीलदार वैशाली पाथरे, निकिता जावरकर, विशेष कार्य अधिकारी हर्षद चौधरी, नायब तहसीलदार मधुकर धुळे, नाझर प्रवीण वैद्य, स्वीय सहायक अतुल बुटे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.