समुद्रपूर : शेडगाव येथील रहिवासी कोठेराव रामभाऊ टिपले वय ५५ वर्ष हे सकाळी ११ च्या दरम्यान बकर्या चारण्यासाठी शिवारात गेले असता झुडपामध्ये असलेल्या बिबट्याने प्राणघातक हल्ला करून ठार केले. सदर घटना शेडगाव गावाजवळील सय्यद पटेल यांच्या पडित जमिनीवर दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
कोठेराव रामभाऊ टिपले हे टेलरींग चे व्यवसाय करायचे पण लॉकडाऊन मुळे दुकाने बंद असल्याने यांनी पन्नास साठ बकर्या घेऊन चारायला जात होते. आज सुद्या नेहमी प्रमाणे ११ वाजताच्या दरम्यान बकर्या घेऊन गावाच्या जवळील चारत होते शेडगाव गावाच्या अर्धा कि. मी. अंतरावर सय्यद पटेल यांच्या पडित जमीनीवर बकर्या चारीत असतांना झुडपात असलेल्या बिबट्याने हल्ला करीत जागीच ठार केले.
तीन वाजताच्या दरम्यान वडील आले नाही म्हणून मुलगा शैलेशने फोनवर संपर्क साघला असता वडिलाकडुन कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने मुलगा शैलैश टिपले याने स्वत: शिवारात वडीलाला पाहण्यासाठी निघाला त्यावेळेस गावालगत असलेल्या सागवनात बकर्या दिसल्या परंतु वडील दिसले नाही तेव्हा तो पुढे पाहायला निघाला असता सय्यद पटेल यांच्या पडित जमीनीवर त्याचे वडील रक्तबंबाळ अवस्थेत दिसुन आले. तेव्हा त्याने त्वरीत पोलीस स्टेशन समुद्रपुर येथे घटनेची माहिती दिली.
घटनास्थळी त्वरीत ठाणेदार हेमंत चांदेवार कर्मचार्यांसह घटना स्थळी दाखल झाले. परंतु प्रेताची पाहणी केली असता गळ्यावरील सदर घावे वन्य प्राण्याचे किंवा बिबट्याचे घाव आहे असे सांगितले आहे. तेव्हा वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली बारेकर यांना माहिती दिली. घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली बारेकर यांच्या सह क्षेत्रसहाय्यक विजय धात्रक, वनरक्षक योगेश पाटील, उमेश बावणे, यांनी येऊन पाहणी करून वरिष्ठांना माहिती दिली. सदर बिबट्या हा परीसरात असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर काही दिवसा अगोदर बच्चा बिबट्याचा अपघातात मृत्यू झाला होता. आजच्या घटनेमुळे सदर परीसरात बिबट्या असल्याचे निष्पन्न झाले.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024