बाईक सुसाट पळवायला आवडत नाही, असं कोणताही युवक म्हणणार नाही. किक मारली की हवेशी स्पर्धा करणार्या वेगाने पुढे जाणं ही आजकालची फॅशन बनली आहे. पण यावेळीही काळजी घ्यायला हवी.
आपल्याला छान ड्राईव्ह करता येतं; त्यामुळे बाईक कशीही चालवली तरी चालतं असं वाटून आपण वाहतुकचे नियम विसरुन जातो. बाईक चालवताना एका हातात मोबाईलवर संभाषण सुरु आणि दुसरा हात गाडीच्या हँडलवर, असं धाडस अंगलट येऊ शकतं. त्यामुळे बाईक एका बाजूला घेऊन मोबाईलवर बोलणं उत्तम.
कानामध्ये मोबाईलची कॉड घालून गाडी चालवणं टाळा. यामुळे मागून येणार्या वाहनांनी हॉर्न दिला तरी ऐकू येणार नाही. मित्रांबरोबर रेस लावत पर्यटनस्थळाला जाणं कुणाला आवडणार नाही? पण हे थ्रील अनुभवताना गाडीचे ब्रेक, टायर व्यवस्थित चेक करा. कडक उन्हामुळे रस्त्यावरील डांबर विरघळतं. त्यामुळे गाडीचा टायर फुटणं, पंक्चर होणं अशा समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच प्रवासापूर्वी गाडीचं सर्व्हिसिंग करणं गरजेचं ठरतं. परीक्षेच्या काळात गाडीच्या स्थितीकडे लक्ष नसतं. परंतु वेळ मिळताच गाडीचे टायर्स, ब्रेक चेक करुन घेणं उत्तम ठरतं. बाहेरगावी जाताना गाडीची महत्त्वाची कागदपत्रं, लायसन्स जवळ आहे की नाही याची खात्री करायला हवी. गाडी उतारावर पार्क करताना गअर टाकूनच पार्क करणं उत्तम ठरतं
Related Stories
November 20, 2023
October 27, 2023
October 12, 2023