आज श्री वसंत जाधव तलाठी यांचा 57 वा वाढदिवस त्या निमित्याने मला त्यांच्याविषयी लिहण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो.. आपण सर्वांनी आपल्या चवितील कडवटपणा नाहीसे करून श्री वसंत जाधव यांचे कार्य व माझे लिखाण आपण गोड रूपाने स्विकारसाल अशी अपेक्षा करतो..आणि माझा लेख आपणास आवडला असेल तर..इतरांना शेअर कराल अशी विनंती करतो…
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील एका छोट्याशा तेंडोळी येथे जन्मलेले.. जेमतेम पाचशे घराची वस्ती असलेले हे छोटेसे असलेले गाव अत्यंत गरीब परिस्थिती अन् त्यात हांजी जाधव यांच्या पोटी 10 एप्रिल ला वसंत जाधव यांचा जन्म झाला घरी वडिलांना दारूचे व्यसन तेही हातभट्टीची दारू ते सदैव पियायचे आणि लहान मुलाच्या पोटातील जंत मरतात म्हणून आपल्या मुलाला कप भरून द्यायचे त्या वेळी मुले मुकाट्याने पिऊन घ्यायचे असा तो काळ होता. सात वर्ष वय असताना आजूबाजूचे मुले शाळेत जातात म्हणून त्याला शाळेत घातल्या गेले आई वडील कामाला जात असल्यामुळे घरी लहान बहीण आजारी पडल्यामुळे तिला संभळण्याची जबाबदारी वसंत जाधव यांची होती ती दोन वर्ष अंथरुणाला खीळलेली होती तिला कोणीतरी करणी केल्याचा आई वडिलांना वाटायचे पाळण्यात टाकून झोका देण्याचं काम असायचं त्यामुळे वसंत जाधव यांची शाळेत गैरहजेरी वाढत गेली अन् त्यामुळे त्यांचे नाव पटावरून कमी करण्यात आले ती वर्ष त्यांचा वाया गेला.त्याच वेळी बहीण जग सोडून निघून गेली.त्यांचे कुटुंब अंधश्रध्देच्या आहारी गेल्यामुळे बहिणीचा जीव गेला असावा कदाचित औषधोपचार केला असता तर ती मुलगी वाचू शकली असती.दुसऱ्या वर्षी पुन्हा शाळेत दाखल करण्यात आले.शाळेत ते हुशार होते 30 पर्यंत पाढे त्यांना मुखपाठ झाले होते त्यामुळे त्यांना हुशार मुलगा म्हणून गुरुजी म्हणायचे.त्या गावात एक चिंचेचे झाड होते आजही ते झाड जिवंत आहे. त्या झाडावर खेळत असताना गणिताचे सूत्र त्यांना शिकता आले.अस करता करता ते चौथ्या वर्गापर्यंत पहिल्या नंबरनी पास होत गेले.घराची परीस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे कधी कधी गावातील मुलांसोबत चांदण्या रात्री आर्णी येथील एका सावकाराच्या शेतात कापसाची चोरी केल्याचे ते आवरजून सांगतात..घरात सर्वच अशिक्षित असल्याने चांगले संस्कार कशाला म्हणतात ते त्यांना त्या वेळी कळलेच नाही.
वडील दारू पीत असल्यामुळे ते सुद्धा चवथा वर्गापर्यंत दारू पीत गेले..कारण होतं पोटातील जंत मरतात म्हणून.पुढे वडिलांनी दारू पाडून विकण्याचा वयसाय घरीच सुरू केला होता. चवथ्या वर्गात असताना शिष्यवृत्ती परीक्षे सह प्रथम क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले.गावात पुढे शिक्षणाची सोय नसल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे आर्णी येथील भारती शाळेत तीन किलोमिटर पायी जावे लागायचे.आणि तिथे सुद्धा ये प्रथम श्रेणीमध्ये पास झाले..सकाळी पायात चप्पल नसल्यामुळे रस्त्याने छोटे छोटे दगड पायाला लागून त्यांना फार मोठी जखम झाल्याचे व दोन्ही पाय हत्ती सारखे सुजल्याचे ते आवरजून सांगतात..कधी कधी बाजाराच्या दिवशी ते वडीलासोबत आर्णी ला यायचे वडील तेथेच दारू ढोसून घ्यायचे आणि तेथेच जोर जोराने ओरडत असायचे त्यांचे शाळेतील मित्र श्रीमंत असल्यामुळे त्यांच्या बाबाला कोणी बघितले तर काय होईल याची भीती त्यांना असायची ते त्यांना शांत राहण्याकरिता विनवणी करायचे तेव्हा वडील झोडपे देण्यास मागे पुढे पाहत नसायचे..वडील त्यांना कप कप दारू देत असताना त्यांनी खूप विचार केला मी जर असच वडीलासारख दारू पीत राहील तर माझ्या शिक्षणाचा आणि हुशारकीचा उपयोग काय? त्यांनी निश्चय केला या नंतर दारूला कधीच स्पर्श करणार नाही आणि तेव्हापासून आजपर्यंत ते दारुकडे बघितले सुद्धा नाही असे ते सांगतात. पुढे ते दहाव्या वर्गापर्यंत प्रथम श्रेणी मध्येच पास होत गेले घरी वीज नव्हती चिमणीच्या उजेडात त्यांना अभ्यास करावा लागायचा.त्यामुळे त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना आर्णी येथे खोली करून दिली त्या वेळी खोलीचे भाडे होते 30 रुपये त्या खोलीत चार जण राहायचे म्हणजे प्रत्येकाला 8 रुपये महिना द्यावा लागायचा.ते 8 रुपये सुद्धा देणे अवघड वाटायचे त्या चारजण पैकी एक त्यांचा आते भाऊ किसन राठोड तुकाराम आणखी एक जण..अशा बिकट परिस्थितीतून वाट काढत ते शिकत होते.आजच्या तरुण पिढीला कदाचित हे नवल वाटेल परंतु .हे सर्व सत्य आहे..ज्या ठिकाणी त्यांची रूम होती तेथे एक धार्मिक मंदिर होते तेथे महिन्यातून एक वेळा गोड भात बनवायचे तेव्हा त्यांना एक प्रकारची मेजवानीच असायची.मनसोक्त जेवायचे..
शाळेत शिकत असताना भारत स्काऊट मध्ये 1983 साली आल इंडिया जांबोरी पचमढी मध्यप्रदेश येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते.
वसंत जाधव यांच्या जीवनाला खरी त्या भारती शाळेतील शिक्षकांनी दिली त्यात दिवंगत कलीम खान सर, दिवंगत श्री शंकरराव बुटले सर.श्री. बि.के.राऊत सर..ह्या तीन गुरुमुळेच मी घडलो असे ते छाती ठोक पणे सांगतात..त्यांच्या जीवनात दिवंगत कलीम खान सरांचे फार मोठे योगदान आहे असे ते सर्वानाच सांगतात..बुटले सरानी शिस्त,संस्कार सोबत जगायचं कसं हे शिकल्याचे नेहमी सांगतात..सर……..जीवनाचा पाया रोवला हे मी कधीच विसरणार नाही हे सुध्दा ते बोलून दाखवतात..
पुढे उच्च शिक्षणासाठी ते दुसऱ्या शहरात म्हणजे पुसद येथे शिकायला गेले.तेथे शिक्षण घेत असताना घरून 100 रुपये मिळायचे परंतु त्यांचे चार मित्र घरून श्रीमंत असल्याने त्यांच्याच मदतीने वसंत जाधव यांचे शिक्षण झाले असे ते सांगतात ते मित्र म्हणजे तुकाराम धोंडबा चव्हाण,रमेश धनु जाधव, अनिल खेमा पवार,शेषराव लष्कर चव्हाण..ह्या मित्राचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही हे वाक्य नेहमी त्यांच्या मुखातून निघतात.
अस करता करता ते तलाठीची परीक्षा उत्तीर्ण झाले..तेथूनच त्यांनी जीवनात काय करायचे आणि काय नाही करायचे ते मनोमनी ठरवले..उमरखेड तालुक्यात तलाठी पदावर रुजू होत असताना त्यांच्या तेंडोळी या गावाला खूप आनंद झाला कारण त्यांच्या घरातील तो एकमेव व्यक्ती नोकरीला लागलेला होता..गावातील लोकांचा प्रेम,जिव्हाळा,आपुलकी श्री वसंत जाधव यांनी आजपावेतो जोपासून ठेवली आहे.आपल्या गावाशी असलेले नाते ते विसरलेले नाही..कोणाचं दुःख असो सुख असो ते आपल्या मूळगावी येऊन त्यात सहभागी होतात..हे मी जवळून बघितले आहे..पुढे मराठवाड्यातील सौ.ऋतुजा ताई सोबत लग्न बंधनात अडकले आणि तेथून सहजीवनाचा त्यांचा प्रवास सुरू झाला..योग बघा..वसंत ऋतू…नावसारखेच त्यांची जोडी..सर्वांना भुरळ घालणारी..सहजीवनाचा प्रवास करीत असताना..श्री वसंत जाधव यांनी आपल्यावर मोठ्या भावाने केलेले उपकार आणि उपकाराची परतफेड उपकरानेच करावी या हेतूने त्याने भावाच्या मुलीला आपल्या जवळ नेऊन शिक्षणाची,तसेच सर्वच जबाबदारी उचलून तिला दत्तक घेऊन तिचा मुलीप्रमाणे सांभाळ केला.यात सौ ऋतुजा ताईचा सिंहाचा वाटा आहे..पुढे त्या मुलीचा विवाह एका उच्च शिक्षित शिक्षकासोबत करून बंधू भावाचा,समाजाचा ऋण फेडून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे..सोबत आपल्या सहकार्यामुळे आपल्या नातेवाईकांचा मुलामुलींचा फायदा व्हावा म्हणून वसंत जाधव आणि सौ ऋतजा ताईने साळ्याच्या मुलीला सुद्धा आपल्या जवळ ठेऊन तिचा पण विवाह शासकीय कर्मचारी सोबत लाऊन नात्यात गोडवा कायम ठेवला आहे.
माझ्या गावापासून श्री वसंत जाधव यांचे गाव अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजे दोन किलोमीटर अंतरावर आहे..त्यांच्या गावातील लोक माझ्या उमरी इजारा या गावातील लोकांना पूर्णपणे ओळखतात..आणि आमच्या गावातील लोक त्यांच्या गावातील सर्वांना ओळखतात.श्री वसंत जाधव यांना चित्रकलेमध्ये आवड असल्यामुळे आणि ते उत्तम चित्रकार असल्यामुळे त्याच्याविषयी माझ्या मनात आधीपासूनच जिव्हाळा आहे..मी नागपूरला शासकीय फाईन आर्ट कॉलेज ला शिकत असताना श्री वसंत जाधव यांच्या सोबत माझा पत्रव्यवहार नेहमीच असायचा त्यामुळे आमचे ऋणानुबंध घट्ट होत गेले आणि त्यांच्या कडून मला खूप काही शिकता आल..त्यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर खूप पडलेला आहे..त्यांच्यासारख्या विचारामुळे आज मी आज मी सुद्धा एक उत्कृष्ट चित्रकार,कवी,लेखक,आणि गुरुगौरव पुरस्कार प्राप्त कलाशिक्षक म्हणून माझी महाराष्ट्रात ओळख आहे.
श्री वसंत जाधव उमरखेड ला असताना त्यांनी घरासमोर वृक्ष लावण्याचा संकल्प केला आणि तो प्रत्यक्षात उतरविला.आणि त्यांच्या मनात एक विचार आला मी जर माझ्या घरासमोर झाड लावू शकतो तर इतर ठिकाणी का लावू शकत नाही या विचाराने त्यांनी आपल्या परिसरात झाडे लावण्यास सुरुवात केली.. असं करता करता त्यांनी काही लोकांना विश्वासात घेऊन औदुंबर वृक्षसंवर्धन सेवा समिती स्थापन केली आणि आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने संपूर्ण उमरखेड परिसरात झाड लावण्याचे महान कार्य सुरू केले..आणि आश्चर्य म्हणजे आज पर्यंत त्यांनी उमरखेड शहरात पाच हजार पाचशे पेक्षा जास्त झाडे लावलेली आहे नुसत लावलेलीच नाही तर त्यांना जगवून,वाढवून अख्या उमरखेड शहराला हिरवा शालू पांघरून दिलेला आहे..याची दखल संपूर्ण उमरखेड वासियानी घेतली आहे..असे न भूतो न भविष्यती असं महान कार्य श्री वसंत जाधव आणि त्यांच्या टीम वर्क नी करून दाखवलेले आहे..त्यांच्या टीम वर्क मध्ये 74 वयापेक्षा जास्त वयोवृद्ध व्यक्तीचा समावेश आहे हे सर्व सदस्य आपल्या मुलाबाळाप्रमानेच नित्य झाडाची निगा राखतात त्यांची विशेष काळजी घेतात..ह्या कार्याची दखल घेऊन गोर बंजारा प्रकाशन नागपूर तर्फे 2018 साली वृक्ष संवर्धन बाबत बंजारा भूषण पुरस्कार श्री वसंत जाधव यांना दिला गेला आहे.
एकदा एका श्रीमंत कुटुंबात एक समाजाची बाई कामाला असताना तिचा आकस्मिक मृत्यू झाला आणि तीचं कोन्हीही नसल्यामुळे काय करायचा असा प्रश्न त्या श्रीमंत कुटुंबाला पडला होता..त्या बाईला तिन्ही मुली च असल्यामुळे त्या एकाकी पडल्या होत्या त्यावेळी..समाजाचा व्यक्ती म्हणून श्री वसंत जाधव यांनी त्या बाईचा अंत्यविधी स्व खर्चाने करून समाजाचे ऋण फेडले आहे..एवढेच नाही तर त्या तिन्ही मुलीची जबाबदारी स्वीकारून त्यांच्या लग्न लावून आर्थिक मदत केलेली आहे..तसेच कितीतरी अनाथ मुलीचे लग्न लावून देण्यात वसंत जाधव यांचा मोलाचा वाटा आहे.
आपल्या मुळगावत कोणाचेही निधन अथवा लग्नकार्य असूद्या ते आवर्जून उपस्थित राहतात हे मी अनुभवले आहे.त्यांच्या मातोश्री असेपर्यंत वसंत जाधव आणि सौ ऋतुजा ताईने दिवाळी शहरातील स्वतःच मोठं घर सोडून खेड्यात आई समवेत साजरी केली आहे..दोन वर्षापूर्वी आईचे निधन झाल्यावर तेरविचा कार्यक्रम थाटामाटात न करता त्या पैशात आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ गावातील शाळेत 26000 हजाराचा प्रोजेक्टर घेऊन देऊन गावात आदर्श निर्माण केला आहे..त्यावेळी प्रतक्षात तिथे मी हजर होतो.
त्याच तेंडोळी गावातील सहा मुलीचे पितृछत्र हरवल्याने जनतेकडून एक हात मदतीचा म्हणून आवाहन करून निधी उपलब्ध करून दिला तसेच सार किन्ही येथील आई वडिलांचे छत्र हरवलेल्या तीन अनाथ बालका करिता मदतीचे आवाहन केले.
उमरखेड येथील तीन अनाथ मुलीचे लग्नकार्य करिता श्री वसंत जाधव यांचे मोलाचे योगदान आहे. अनाथ चे नाथांना आवाहन,आई वडिलांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलाकरिता कसा चुकते रस्ता बाळ,कशी तुटते आईची नाळ प्रख्यात मार्गदर्शक वसंत हंकारे सांगली यांच्या संस्कारक्षम कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन वसंत जाधव यांनी केले आहे..कोणी उपाशी मरणार नाही म्हणून मोहदी, सातघरी,दहीवड, कोंदरी, वाकान येथील श्रीमंत दानशूर दात्याकडून कोणी मजदुर उपाशी राहणार नाही याकरता मदतीचे आवाहन करून गरीब जनतेच्या मुखात अन्नाचा घास घालण्याचे कार्य वसंत जाधव यांनी केले आहे.
तरुण पिढीला ते नेहमीच दिशा दाखवत असतात आज उमरखेड व पुसद या भागात वसंत जाधव यांचे नाव आदराने घेतल्या जाते..हीच त्यांची खरी श्रीमंती आहे असं मला वाटते त्यांना दोन चिरंजीव असून ते सुद्धा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कोणत्याही कार्यात वडिलांना सहकार्य करतात. असे आदर्श व्यक्तिमत्व श्री वसंत जाधव तलाठी यांना त्यांच्या 57 व्या वाढदिवशी आभाळभर शुभेच्छा देतो आणि त्यांच्या राहिलेल्या इच्छा आकांक्षा झपाट्याने पूर्ण होवो अशी ईश्वरचरणी मनोमनी प्रार्थना करतो आणि थांबतो…
- धन्यवाद …!
- -सुरेश बा.राठोड
- (कलाशिक्षक तथा क्रिएटिव्ह आर्टिस्ट.)
- मुळगाव: उमरी इजारा ता. आर्णी
- राष्ट्रीय विद्यालय,भिवापूर जिल्हा नागपूर.
- 9765950144