सध्याचा जमाना स्टायलिश राहणीला पसंती मिळण्याचा आहे. प्रत्येक जण खास स्टाईलद्वारे ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतो. तुम्हीही खास स्टाईल स्टेटमेंट बनवू शकता. कसं ते पहा.
सध्या साडी आणि ब्लाऊजमध्ये मोठं वैविध्यं उपलब्ध आहे. ऑफशोल्डर किंवा बॅकलेस ब्लाऊज हे बोल्ड स्टाईल स्टेटमेंट आहेत तर स्टँड कॉलर, बंदगळा हे रॉयल स्टाईल स्टेटमेंट मानले जातात. कोण म्हणतं ज्ॉकेट केवळ वेस्टर्न आउटफटवरच चांगलं दिसतं? लहंगा, साडी, टॉप यांसारख्या पोषाखांवरही ज्ॉकेट खुलून दिसतं. स्लीव्हजसोबत किंवा स्लीव्हजशिवाय ज्ॉकेट ट्राय करू शकता. ज्ॉकेट आणि ब्लाऊजचं कॉम्बिनेशन केलं तर वेगळा लूक मिळण्यास मदत होते. बोल्ड फॅशनच्या चाहत्या असाल तर डीप नेक हा सर्वोत्तम पर्याय आहे. पार्टीमध्ये डीपनेक ब्लाऊज तुम्हाला स्टाईलआयकॉन बनवू शकतो. कपड्याचा फॉरमॅट कोणताही असो, त्यावरील कलाकारीलाही तुम्ही स्टाईल स्टेटमेंट बनवू शकता. लखनवी चकनकारी, राजस्थानी आरसेकाम, काश्मिरी कशिदा किंवा मधुबनी चित्रशैलीला कपड्यांवर स्थान देऊनही वेगळा लूक मिळवू शकता.
Related Stories
November 20, 2023
October 27, 2023
October 12, 2023