- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे आणि रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने 9 ऑगस्ट 2022 या क्रांतीदिनी नवव्या विद्यार्थी व शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाशजी रोकडे साहेब, स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, प्रमुखातिथी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकांत वानखेडे सर प्रा. डॉ.अशोककुमार पगारिया, निमंत्रक प्रा. बाळासाहेब गार्डी होते.मुख्य कार्यवाहक प्रा. प्रशांत रोकडे, ज्येष्ठ जलतज्ज्ञ मा. अनिल पाटील यांच्या हस्ते प्रा.डॉ. गौतम बेंगाळे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार तसेच महाराष्ट्रातील दहा शिक्षकांना बंधुता गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यात प्रा. डॉ. बंडोपंत कांबळे (औंध), मा. विद्या रमेश गायकवाड (अहमदनगर),प्रा. एस.टी. पोकळे (मंच), मा. अंबादास रोडे (मुळशी), मा.प्रीती जगझाप (चंद्रपूर ),मा. चंदन तरवडे (कोपरगाव), मा.महेश भोर (मंचर), मा. संदीप राठोड (निघोज), प्रा. के.बी. एरंडे (मंचर) प्रा. व्ही. बी. फसाले (मंचर),या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर येथील कर्मवीर सभागृहामध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. मोठ्या संख्येने प्राध्यापक, शिक्षकवृंद, साहित्यिक, विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.