अमरावती : राजापेठ पोलिस कोठडी मध्ये अटकेत असताना कारागृहातील न्यायबंदीच्या मृत्यूप्रकरणी माहितगारांनी माहिती देण्याचे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी रणजीत भोसले यांनी केले आहे.
अप. क्र. 1540/ 2021, कलम 363, 379, (2) (एन) भांदवि सहकलम 4 पोक्सो कायद्यामध्ये अटकेत असणारे मृतक सागर श्रीपत ठाकरे, रा . खंबित, पो. अंतोरा, ता. आष्टी, जिल्हा वर्धा यांचा दि. 19 ऑगस्ट 2021 रोजी राजापेठ पोलिस कोठडी येथे मृत्यू झाला. याबाबत जिल्हा दंडाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले असून, चौकशी अधिकारी म्हणून उपविभागीय दंडाधिका-यांची नियुक्ती केली आहे.
या चौकशीमध्ये कैद्याच्या मृत्यूचे कारण, कैद्याचे मृत्यूपूर्व स्वास्थ्य, कैद्याला मारहाण होऊन त्यामध्ये मृत्यू झाला किंवा कसे, या प्रकरणात पोलिसांची भूमिका, वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे व व्हिसेरा अहवाल या बाबींची चौकशी करण्यात येणार आहे. याबाबात ज्यांना माहिती असेल किंवा यासंबंधी माहिती द्यावयाची असेल अशा सर्व इच्छुकांनी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी वस्तुस्थितीदर्शक माहिती व आवश्यक कागदपत्रासह त्यांची प्रतिज्ञापत्रे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, तहसील कार्यालय परिसर, श्याम चौक, अमरावती यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत शुक्रवार, दि. 15 ऑक्टोंबरपर्यंत स्वतः सादर करावीत, असे आवाहन चौकशी अधिकारी श्री. भोसले यांनी केले आहे.
(छाया : संग्रहित)