- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती मध्यवर्ती कारागृहातील न्यायबंदीच्या मृत्यूप्रकरणी माहितगारांनी माहिती देण्याचे आवाहन तिवसा-भातकुली उपविभागीय दंडाधिकारी तथा चौकशी अधिकारी डॉ.नितीन रामकृष्ण व्यवहारे यांनी केले आहे.
न्यायबंदी साहेबराव देविदास गुडदे, वय 56 वर्षे, बंदी (क्र. 5463/2020), डोंगर यावली, ता. मोर्शी, जि. अमरावती यांचा दि. 8 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 4.40 वाजता अमरावती सुपरस्पेशालीटी हॉस्पीटल येथे मृत्यू झाला. या चौकशीमध्ये कैद्याच्या मृत्यूचे कारण, कैद्याचे मृत्यूपूर्व स्वास्थ्य, कैद्याला मारहाण होऊन त्यामध्ये मृत्यू झाला किंवा कसे, या प्रकरणात पोलिसांची भूमिका, वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे व व्हिसेरा अहवाल या बाबींची चौकशी करण्यात येणार आहे.
याबाबत ज्यांना माहिती असेल किंवा यासंबंधी माहिती द्यावयाची असेल अशा सर्व इच्छुकांनी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी वस्तुस्थितीदर्शक माहिती व आवश्यक कागदपत्रासह त्यांची प्रतिज्ञापत्रे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, जुनी तहसील कार्यालय,भातकुली कॅम्प परिसर, चपराशीपुरा जवळ अमरावती यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत,दयावी असे आवाहन तिवसा-भातकुली उपविभागीय दंडाधिकारी तथा चौकशी अधिकारी डॉ.नितीन रामकृष्ण व्यवहारे यांनी केले आहे.
- (छाया : संग्रहित)