अमरावती : बँक ऑफ महाराष्ट्र एस.सी, एस.टी, अॅन्ड ओबीसी एम्प्लाईज असोशिएशन झोनल कमेटीच्या वतीने आद्य शिक्षीका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. तसेच अमरावती झोनल कमेटीची नवीन कार्यकारीणी गठीत करून घोषीत करण्यात आली.
स्थानिक हॉटेल ग्रेस इन येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात डॉ. भि. अ. वाघमारे माजी परीक्षा नियंत्रक व सिनेट सदस्य, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती, अॅड. पी.के राऊत, संघटनेचे माजी झोनल अध्यक्ष रोशन कांबळे, कोषाध्यक्ष केंद्रीय कार्यकारीणी, अरुण केळझरे, संघटनेचे झोनल कमेटीचे अध्यक्ष अरुणकुमार आठवले संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते चंद्रसेन डोंगरे कार्याध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माता सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. नुकतेच बँकींग सेवेतून सेवानिवृत्त झालेले संघटनेचे अध्यक्ष अरुणकुमार आठवले व कार्याध्यक्ष चंद्रसेन डोंगरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात येऊन निरोप देण्यात आला. पदोन्नती कर्मचारी रुपेश घोडे, शशीकांत मानकर, वर्षा थुल, आस्लेष गजभिये, पंडीत सरदार, यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवर डॉ. भी. र. वाघमारे, चंद्रसेन डोंगरे, रोशन कांबळे, सुरेंद्र रामटेके, अरुणकुमार आठवले अजय मनवर, अॅड पी. के. राऊत इत्यादी मान्यवरांची भाषणे झालीत.
दुसर्या सत्रामध्ये नवीन कार्यकारीणी गठीत करण्यात आली. झोनल कमेटीचे अध्यक्ष अरुणकुमार आठवले व कार्याध्यक्ष चंद्रसेन डोंगरे यांची सेवानिवृत्ती झाल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर झोनल अध्यक्षपदी अश्वीन जांभुळकर तर कार्याध्यक्षपदी संदेश फोकरे यांची नियुक्ती करण्यात आली असून झोनल सचिवपदी सुरेंद्र रामटेके यांना कायम करण्यात आले. तसेच वर्षा थुल, अमोल सहारे, राजेश परदेशी, यांची उपाध्यक्ष पदी तर रोहित मेश्राम यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
डॉ. भी. र. वाघमारे व अॅड. पी. के. राऊत यांचे हस्ते अरुणकुमार आठवले यांना राज्यस्तरीय गुणीजन जीवनगौरव पुरस्कार जाहिर झाल्याने सन्मानीत करण्यात आले. त्यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी द्वारा पाठविण्यात आलेले पुरस्कार मान्यवरांचे हस्ते वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सुरेंद्र रामटेके व भारती तुपसुंदरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन संदेश फोकरे यांनी केले कार्यक्रमास सभासदाची बहुसंख्य उपस्थिती होती.
0–
Related Stories
September 14, 2024
September 8, 2024