संशोधनाद्वारेविविध विकारांवर अनेक प्रकारच्या लसी आणि इतर उपाययोजना उपलब्ध असल्या तरी दरवर्षी काही आजार डोकं वर काढताना दसतात. साधा ताप, विषाणूजन्य ताप, डेंग्यू, चिकुनगुनिया यासारख्या विकारांची साथ पसरली की एकच घबराट उडते. वातावरण बदलामुळेही शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन फ्लूसारखे विकार जडतात. त्यांचीही दखल घ्यायला हवी. फ्लू हा साथीचा आजार आहे. हा विकार कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तीला कधीही जडू शकतो. पण मध्यंतरीच ब्रिटिश संशोधकांनी यावर लस शोधण्याचा दावा केला आहे. जगभरातल्या फ्लूच्या विषाणूंना अटकाव करण्याच्या दृष्टीने ही लस महत्त्वपूर्णठरणार असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. यामुळे भविष्यातल्या साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवणं शक्य होणार असल्यानेहे संशोधन महत्त्वाचं मानलं जातंय. लँकस्टर विद्यापीठातल्या संशोधकांनी याबाबत संशोधन केलं होतं. बर्याच वर्षांच्या संशोधनानंतर या संशोधकांनी दोन लसी शोधल्या आहेत. एका लसीमुळे फ्लूला ८८ टक्क्यांपर्यंत निष्क्रिय करणं शक्य होणार आहे तर दुसर्या लसीमुळेइन्फ्लुएंझावर ९५ टक्के नियंत्रण ठेवणं शक्य होणार आहे. विविध प्रकारच्या फ्लूवर नियंत्रण ठेवणारी ही जागतिक लस आहे असा संशोधकांचा दावा आहे. विविध प्राण्यांवर तपासणी केल्यावर लवकरच माणसावर याचा प्रयोग करण्यात येणार आहे.
Related Stories
November 20, 2023
October 27, 2023
October 12, 2023