मुंबई : सारा अली खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सिक्युरिटी गार्डने फोटोग्राफरला ढकल्याचं कळल्यावर सारा त्याच्यावर रागावते. एवढंच नाही तर ती गार्डला फोटोग्राफरची माफीही मागायला सांगते.
मुंबई-सारा अली खान सध्या तिच्या अतरंगी रे चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. पण कार्यक्रम संपल्यानंतर सारा गाडीत बसून घरी जाण्यासाठी बाहेर आली तेव्हा असे काही घडले की ती फारच चिडली. साराने यासाठी छायाचित्रकारांची माफीही मागितली. नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण, जाणून घेऊया. सारा अली खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सारा म्हणतेय, कुठेय तो आहे? तू कोणाला पाडलं? ज्यांना पाडलं ते निघून गेले.
कृपया त्यांना सॉरी म्हणा. तुम्ही असे करू नका. तुम्ही कोणालाही धक्का देऊ शकत नाही. यानंतर सारा सर्व छायाचित्रकारांना सॉरी म्हणते आणि गाडीत बसून निघून जाते. साराच्या याच कृतीवर अनेकजण अभिनेत्रीचं भरभरून कौतुक करत आहेत. सहसा, अनेक स्टार्स छायाचित्रकारांना किंवा चाहत्यांना ढकलताना किंवा त्यांना बाजूला करताना दिसले आहेत. तिथेच साराकडून इतरांना दिली जाणारी वागणुक सर्वांचं मन जिंकत आहे. छायाचित्रकार असो की चाहते, सारा प्रत्येकाशी आत्मियतेने बोलताना दिसून येते.