Skip to content
कही बोलू नोको, अन् मा दिमाख खऊ नोको तू रमश्या…..!
तुया आयकु नोय..अन् म्या सांगू नोय….!
अरे काय सांगू….जो बायडेन मले विचारल्याशिवाय पान ना खाये….!
तो बायडेन, त्याले एव्हळ मोठ पद भेटल तरी मले सांगतल नाही ना बलावल नाही…… !
भाउ…. पयले मले हासून घीऊ द्या…!
भौ…आतापर्यंत तुमी आपल्या वीदरभाच्या अंदर फेकत होते…ते ठीक होत
बाबू रमेस !..मले काही खुशी नाही… आपल्याले खोटं बोलन जमत नाही…हे पुऱ्या गावले महित हाय…..!
बरं मंग् बापूराव भौ…तुमची ओयख कशी झाली..!
हा…आता कसं बोलला.. त तो बायडेन पयले लहानपनी आपल्या देशात होता, त्याच्या मामाच्या घरी शिंगनापूर लेहोता…. माया मामा तीतचाच ….! गरीब होता बीचारा….
नाही ना बे, त्या बायडेन चा मामा गरीब होता..!
त्याच्या मामान अन् त्यानं मा मामाची तुर सोंगाले घेतली होती..अन् मी होतो पेंढ्या बांधले…!
हासा येऊन रायला राजेहो बापूराव भाउ…!
तुले त निरा चंडान्या सुचते..!
आयका च अशिन त पुळच सांगतो….!
नही त तूले माहित हाय, बोलाले फुरसत नाही मले…!
मंग आमचा झाला दोस्तांना….
दातकळ बंद करशिन त सांगतो…..!
मंग आम्ही घेतल्या बकऱ्या …
अर्धे पैसे त्याचे अन् अर्धे माये…
सकाळी थो चारे….अन् दुपारी थो माई शिदोरी आनाले जाये….! असं करता करता
एक खंडी च्या दा खंड्या झाल्या ना….!
पन एक दिवस त्याची नियत फिरली …!
मी गेलो होतो साईच्या लग्नाले…अन् पठ्ठ्यान पुऱ्या बकऱ्या मा मांग इकल्या..!
अन् पायटच्या येष्टिन पैसे घिवून पयाला…!
म्या लय पता काळाची कोशिस केली, सारे बजार फिरलो, पन कुठ गेला समजल नाई…!
अन् काल म्या टिवी पायली …दिसला ना तो…!अशी तळपायातली मस्तकात गेली….!
म्हणून मी हाव रागात …अरे ज्याले म्या साथ देली…तो बेमान झाला त राग इन् नाई त काय..?
त्या लंब्या अन् फुसाळ्या गोष्टी झाल्या असतीन त …
हे शेन काळा…अन् कोठा धुवा….!
आईकु आल् का ..यिवू तिथं..!
रमश्या.. पय लवकर ..नाही त मायासंग तूही उतरून दीन बुडी…!
Like this:
Like Loading...