कोल्हापूर : शहरातील सरनोबतवाडी येथील राजाराम तलावात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना हा मृतदेह एका प्लास्टिक पिशवीत निदर्शनास आला. याची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्या महिलेची ओळख पटवण्याचे काम पोलिसांनी तातडीने सुरू केले.
मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना आज सकाळी राजाराम तलाव येथे एका पिशवीत मृतदेहाचे अवशेष असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी तत्काळ ही बाब पोलिसांना कळवली. पिशवीतून अवशेष बाहेर काढल्या नंतर हे एका महिलेच्या अर्धवट मृतदेहाचे अवशेष असल्याचे स्पस्ट झाले. या महिलेचा खून करून तिचा अर्धवट मृतदेह पाण्यात फेकून दिल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. मृतदेहाचा पंचनामा करून ते शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये पाठवण्यात आले आहे. ही महिला अंदाजे 60 वर्ष वयोगटातील असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम राजारामपुरी पोलिस ठाण्यात सुरू आहे.
Related Stories
December 4, 2023
December 4, 2023