- दाटूनी आले आभाळ
- मन आठवणीत गेले
- डोळ्यातून सरसर
- पार ओघळू लागले..
- होती विश्वासाची कुशी
- नाही त्याला कसली तोड
- धुंद त्या गोड आठवणी
- त्यांना आसवांची जोड..
- सोन्यासारख्या माणसांनी
- सदा भरलेली मातीची घरे
- अंगणातही मैफिल चाले
- आनंदीत असत साऱ्यांची चेहरे..
- लहानांसोबत मोठी माणसेही
- मनमोकळी हसत नि खेळत
- नव्हता कसला मोठेपणा नि स्टेटस
- बेधुंदपणे रोज ती जगत असत..
- गेले ते दिवस बालपणीचे
- राहिल्या आठवणी सुखाच्या
- गुंतूनी त्या प्रेमळ विश्वात
- डोळ्यांत आसवे समृद्धीच्या..
- सौ.कोमल शिंदे,
- धुळे.