वर्धा : अनलॉकच्या प्रक्रियेत चित्रपटगृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. दरम्यानच्या काळात दोन आठवड्यापयर्ंत चित्रपटगृहे सुरू झालीत. पण, प्रेक्षकांचा नगण्य प्रतिसाद आणि नवीन सिनेमे नसल्याने चित्रपटगृह सध्या बंदस्थितीत आहेत. त्यामुळे रोजचा होणारा खर्च कुठून भरून काढावा, असा प्रश्न चित्रपटगृहमालकांपुढे निर्माण झाला आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊनचा फटका चित्रपटगृहांना देखील बसला आहे. राज्यातील सिंगल, डबल स्क्रिन चित्रपटगृहे लॉकडाऊनच्या काळात बंद करण्यात आले. त्यानंत अनलॉकच्या प्रक्रियेत चित्रपटगृहे उघडण्यास परवानगी देण्यात आली. मध्यंतरी दोन आठवड्यापयर्ंत चित्रपटगृह मालकांनी चितट्रपगृहे सुरूदेखील केलीत. त्यामध्ये काही शो झालेत. पण, प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद नसल्याने चित्रपटगृह मालकांची काळजी वाढली. नवीन सिमेने नसल्याने प्रेक्षकांची नगण्य उपस्थिती पुन्हा चित्रपटगृहाचे प्रवेशद्वार बंद करायला कारणीभूत ठरली. काही ठिकाणी चित्रपटगृहे सुरू असण्याची शक्यता आहे. पण, वध्र्यातील तिनही चित्रपटगृहे बंद आहेत. नवीन सिनेमे नसल्याने आणि प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. चित्रपटगृहे बंद असल्याने त्याचा निगडीत व्यवसायांवरदेखील परिणाम झाल्याचे सांगितले जाते. चित्रपटगृहे सुरू केल्यानंतर खर्चातदेखील वाढ झाली होती. आताही चित्रपट गृहचालकांना दैनंदिन खर्च करावाच लागत आहे. हा खर्च कुठून काढावा, असा प्रश्न चित्रपट गृहचालकांपुढे निर्माण झाला आहे.
Related Stories
September 8, 2024
September 5, 2024