- शेषराव चव्हाण
दारव्हा (प्रतिनिधी ): वाढदिवस म्हणजे शुभचिंतन करण्याचा दिवस. आजकाल सर्वत्रच लहानथोरांचे वाढदिवस साजरा करण्याची फॅशन आली आहे. या दिवशी केक कापणे, मेणबत्त्या विझवणे, भेटकार्ड, गिफ्ट, गोडधोड, बरेचदा दारू मटणाची पार्टी सुद्धा केली जाते. पण करजगाव येथील राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा. रमेश वरघट यांनी आपला वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला. त्यांनी आपल्या परिसरातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना पाटी, पेन्स, रजिस्टर, नोटबुक, टिफिन, वॉटर बॅंक, स्कूल बॅग, यासारखे शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
आपल्या 62 व्या वाढदिवशी रस्त्याच्या कडेला तसेच शेतीच्या धुर्यावर वड, पिंपळ, बेल, चिंच, करंज, बदाम, गुलमोहर, अशोक, यासारख्या वृक्ष प्रजातीच्या 62 रोपट्याचे वृक्षारोपण केले.या वृक्षारोपणात अवधूतराव बरडे, संजय बरडे, दशरथ बरडे, राम चव्हाण, रंगराव चव्हाण, संजय राठोड, कुणाल राठोड,दिक्षांत बरडे, निखिल वानखडे, तन्वी वानखडे, रोशनी जाधव, पूजा बरडे, अंकिता जाधव, विशाखा बरडे,साहिल, चिंटू बरडे आदिंचे त्यांना सहकार्य लाभले.