अमरावती : शिक्षक साहित्य संघ महाराष्ट्र राज्याच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त ऑनलाइन व्याख्यान मालेचे आयोजन अमरावती जिल्हा शाखेतर्फे करण्यात आले आहे.
या व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प
“पुराणकथांचा अर्थ” या विषयावर
प्रमुख व्याख्याते – महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक,कवी,लेखक,
विचारवंत ,महिला महाविद्यालय,
अमरावती येथील निवृत्त प्राध्यापक डॉ.अशोक राणा गुंफणार आहेत.
ते 1967 पासून सामाजिक आणि राजकीय विषयावर सतत लेखन करीत आहेत. राजमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज,
छ.संभाजी महाराज,छ.शाहू महाराज यांच्यावर त्यांनी विपूल लेखनकेलेलेआहे.गणेश,विठोबा,
लक्ष्मी,ग्राम निर्माण पंचक,हिंदू देवदेवता यातील अंधश्रद्धा यावरही लेखन केलेले आहे. आदिमाया,मातृदेवता या गाजलेल्या पुस्तकांसह त्यांची सत्तर पुस्तके आजपर्यंत प्रकाशित झालेली आहेत व अकरा पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत .त्यांनी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय साहित्य पीठावर शोधनिबंधांचे वाचन वाचन केलेले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष- प्रा.ज्ञानेश्वर हंडरगुडीकर,विभागीय अध्यक्ष,शिक्षक साहित्य संघ,मराठवाडा विभाग हे असून
प्रमुख अतिथी – मा.जयदीपभाऊ सोनखासकर, संस्थापक अध्यक्ष,शिक्षक साहित्य संघ,महाराष्ट्र राज्य हे आहेत आणि या व्याख्यानमालेचे संचालन कवी व लेखक प्रा.अरुण बुंदेले करणार आहेत.
आज दि.२९ आँगस्ट २०२१ ला सायंकाळी ७.०० वाजता सर्वप्रथम प्लेस्टोअरवरून गुगलमिट डाऊनलोड करून नंतर खालील लिंकवर क्लिक करून या ऑनलाईन व्याख्यानाचा सर्व शिक्षक,प्राध्यापक,
अधिकारी,साहित्यिक,रसिक व
विद्यार्थ्यांनी खालील लिंकवर क्लिक करुन आँनलाईन उपस्थित राहून लाभ घ्यावा , असे आवाहन शिक्षक साहित्य संघ ,अमरावती जिल्हाध्यक्ष
अतुल ठाकरे व सर्व पदाधिका~यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
Meeting URL: https://meet.google.com/fwy-hsrc-dqd