- शेषराव चव्हाण
करजगाव (प्रतिनिधी): करजगाव येथील प्रतिष्ठित नागरिक प्रा. गोपाल चव्हाण यांचे वडील तंटामुक्तीचे अध्यक्ष लक्ष्मणराव उकंडराव चव्हाण यांचे अल्पशा आजाराने काल दि.१७/०८/२०२२ रोजी दु:खद निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय ७२ वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी देवकाबाई, मुले पांडुरंग, प्रा. गोपाल, मुलगी सौ.सुनिता राठोड, सौ. ललिता राठोड, जावाई,नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
अत्यंत मनमिळाऊ स्वभावाने ते सर्वत्र परिचित होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्य संस्कार करण्यात आला.याप्रसंगी आठवणीतील करजगाव समूहाचे वतीने सर्व सदस्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.