- जगताना जरा । व्हावे सावधान ।
- व्यर्थ अभिमान । करू नका ।।
- नका देऊ त्रास । व्यर्थची कोणाला ।
- दुखवू मनाला । नका कोणी ।।
- कोणाचीच सत्ता । नाही कोणावर ।
- ताबा मनावर । ठेवा जरा ।।
- मीपणा म्हणजे । भयंकर रोग ।
- भोगणार भोग । अभिमानी ।।
- प्रामाणिक रहा । आपल्या नात्याशी ।
- लढणे कोणाशी । टाळा जरा ।।
- नात्यात शंकेला । नका देऊ स्थान ।
- मनामध्ये घाण । आणू नका ।।
- स्वतः योग्य मार्ग । पत्करून चला ।
- एकतरी कला । शिकूनिया ।।
- अंतःकाळ येता । मरण्या हसत ।
- पुण्यची सतत । करायचे ।।
- अजु स्वीकारतो । माणुसकी धर्म ।
- करायचे कर्म । मनुष्याचे ।।
- -अजय रमेश चव्हाण,
- तरनोळी ता.दारव्हा,
- जि.यवतमाळ
- मो.८८०५८३६२०७
—–
(Images Credit : your quote.in)