आहारात प्रथीनयुक्त घटकांच्या समावेशाचे महत्त्व जाणून घेताना काही मुद्द्यांकडे विशेषत्वाने लक्ष द्यायला हवे. डाळी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत असतो. पण डाळींमध्ये काही प्रकारची अमिनो अँसिड्स नसतात. त्यामुळेच ती मिळवण्यासाठी धान्यांचा वापर गरजेचा ठरतो. एकमेकांना पूरक अशा धान्य आणि डाळींच्या मिर्शणातून सर्व प्रकारची अँसिड्स तुम्ही मिळवू शकता. त्यामुळे डाळ खिचडी हा प्रथिनांचा परिपूर्ण स्रोत ठरू शकतो. वनस्पतीजन्य पदार्थांमधून प्रथिनांसह इतर अनेक पोषक घटकही मिळतात.
प्राणीजन्य प्रथिनांमध्ये सर्व प्रकारची अमिनो अँसिड्स असतात. म्हणूनच दुग्धजन्य उत्पादने, मासे, अंडी, चिकन हे प्रथिनांचे सर्वोत्तम स्रोत असतात. यातून बी १२, ड ही जीवनसत्त्वे तसेच ओमेगा ३ फॅटी अँसिड्सही मिळतात. पण नियमित मांसाहार आरोग्याला घातक ठरू शकतो. लाल मांसामुळे कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा मांसाहार करणे योग्य ठरते. आहारात डाळी आण धान्यांचे मिर्शण करा तसेच बीन्स, कठीण कवचाची फळे खा. वजन कमी करण्यासाठी चिकन, अंडी, दूध, सोया, क्वनोआ, मटार, कठीण कवचाची फळे, हातसडीचा तांदूळ, सुरमई मासा, पनीर आणि अँव्होकॅडो आदी प्रथीनयुक्त पदार्थ उपयुक्त ठरू शकतात. तज्ज्ञांचा हा सल्ला लक्षात घ्या.
Related Stories
November 20, 2023
October 27, 2023
October 12, 2023