आज २६ जानेवारी २०२१. भारतीय प्रजासत्ताकाचा विजय दिन असं म्हटल्यास आतिशयेक्ती ठरणार नाही. कारण त्याच दिवशी भारतीय प्रजासत्ताक लागू झाले. तसं पाहता जे संविधान तयार झाले. ते सव्वीस नोव्हेंबरलाच. परंतू ते लागू करीत असतांना त्यासाठी तब्बल दोन महिने वाट पाहावी लागली.
भारतीय संविधान एवढं मजबूत आहे की ते संविधान विदेशातही अभ्यासलं जातं. तसं पाहता जगात चार प्रकारच्या राज्यघटनेचा अभ्यास केला जातो.लिखीत राज्यघटना, अलिखीत राज्यघटना, परिदृढ राज्यघटना व परीवर्तनीय राज्यघटना. त्यापैकी भारतात परीवर्तनीय राज्यघटना आहे. याच राज्यघटनेला परीवर्तनशील राज्यघटना असेही म्हणतात. त्याचप्रमाणे अमेरिका
या देशामध्ये परिदृढ राज्यघटना अस्तित्वात आहे. तसेच ज्यांनी आपल्या देशावर राज्य केलं. त्या इग्लंडमध्ये अलिखीत राज्यघटना असून तेथील मंडळी ही आजही दैववादी आहेत. ते आजही आपल्या देशातील राजांवर विश्वास ठेवतात. आजही त्यांचं राष्ट्रपतीपद हे वंशपरंपरागत चालत असतं. त्यांच्यात निवडणूक होत नाही.अगदी शांततामय मार्गानं कुटूंबात जो जेष्ठ असतो. त्याला राजपद देतात. परंतू भारतात तसं नाही.
ज्यांनी आपल्याला व्यवहार शिकविला. त्यांनीच आपल्या देशाला राज्यघटना लिहायला भाग पाडलं. त्याचं कारणही तसंच होतं.
इंग्रज जेव्हा भारतात आले, तेव्हा त्या इंग्रजांनी पाहिलं की या भारतातील बहुतःश लोकं हे अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात. तसेच यांच्यात आपापसात भांडणं आहेत. हे एकत्र राहू शकत नाहीत. यांच्या एकत्रीत न राहण्यामुळं यांच्यावर कोणीही आक्रमण करुन यांना कोणीही गुलाम बनवू शकतात. इथे मुळातच हिंदू मुस्लिम वादंही होत असतात. या वादात कोणी कोणाला ऐकत नाही.
मुळात ही मंडळी शुर वीर आहेत. हे इंग्रज ओळखून होते. कारण एकट्या सिद्धनाथ नावाच्या महार माणसानं आपल्या साथीला पाचशे लोकं घेवून अठ्ठावीस हजार पेशवे कापून काढले होते. तसेच एकट्या शिवाजीने दोनचार निवडक मावळे घेवून बलाढ्य मुघलांवर विजय मिळवून स्वराज्य स्थापन केले होते. नव्हे तर शिवरायाच्या मृत्यूनंतरही संभाजी व राजारामानं तसेच ताराबाईनं शरणागती पत्करली नव्हती. शेवटी औरंगजेब बादशहा हैराण झाला आणि त्याने मराठ्यांचा नादच सोडून दिला. हे सर्व इंग्रज जाणून होते.
भारतीय इतिहासाचा व वस्तुस्थितीचा अभ्यास इंग्रजांनी केला होता. आर्य भारतात कसे आले. मोगल भारतात कसे आले. आम्ही भारतात कसे आलो. हेही इंग्रजांना ठाऊक होते. त्यामुळं भारत सोडून जातांना इंग्रजांनी विचार केला की यापुढे भारतीय भोळ्याभाबड्या लोकांना कोणीही गुलाम करु नये. त्यांच्यावर कोणीही मोगल आणि आर्यासारखं आणि आमच्यासारखं आक्रमण करु नये. म्हणून त्यांनी भारतीय लोकांना राज्यघटना लिहायला लावली. त्यातच ती राज्यघटना ही दुही माजविणारी नसावी असंही सांगीतलं. त्याचं कारणही तसंच होतं. ते म्हणजे या भारतातील लोकं हे निंदक प्रवृत्तीचे होते. तसेच ते स्वार्थी होते. ते आपला स्वार्थ साध्य करण्यासाठी एकमेकांवर आरोप करुन कसे राज्यकर्त्यांना शरण जातात हे इंग्रजांना माहित होते. त्यानुसार ते कशी एकमेकांची निंदा करतात हेही इंग्रज जाणून होते.
त्यांनी प्रसंगी त्यांच्या देशातील राज्यघटना पाहिली नाही. ती राज्यघटना अलिखीत असली तरी आमच्या देशातील लोकं जसे वागतात. तसे भारतातील लोकं वागत नाही हे त्यांनी पाहिलं. त्यामुळे त्यांनी भारतानं राज्यघटना लिहावी असं सुचवलं. त्यानुसार ती कोणी लिहावी यासाठी शोधाशोध सुरु झाला. कोणी सांगत होते इंग्लंडमधील माणसानं राज्यघटना लिहावी. परंतू भारताची ही राज्यघटना लिहिण्यासाठी इंग्लंडमध्येही व्यक्ती मिळाला नाही. शेवटी भारतातील माणसांचा राज्यघटना लिहिण्यासाठी शोधाशोध सुरु झाला. परंतू तशी माणसं राज्यकर्त्यांना भारतातही गवसली नाहीत. कारण भारतीय लोकांचा स्वभाव हा स्वार्थी तर होताच. शिवाय हेकेखोर व दुस-याचे पाय खिचण्यात भारतीय पटाईत होते. शेवटी भारतातील लोकांनी सांगीतलं की आम्हाला असा माणूसच गवसत नाही की जो राज्यघटना लिहणार.
इंग्रजांनी विचार केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सुचवलं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विद्वान होते. पण जातीनं महार. भेदभाव चरणसीमेला होता. त्यांना कसं लिहायला द्यावं.असाही विचार राज्यकर्त्यांच्या मनात होता. पण शेवटी लिहिणार कोण? उपाय नव्हता. शेवटी काही पर्याय नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेबांना राज्यघटनेच्या मसुदा समितीवर घेतलं. त्यातही पाच लोकं ठेवले. पाचांनी मिळून लिहायची होती राज्यघटना.
राज्यघटना लिहायला बाबासाहेबांना देण्यामागेही उद्देश होता. पहिला उद्देश म्हणजे डॉक्टर बाबासाहेब हे जरी महार जातीचे असले तरी त्यांची पत्नी उच्चवर्णीय होती. तसेच त्यांना आंबेडकर नावाच्या उच्चवर्णीय माणसानं शिकवलं होतं. तसेच मुळात उच्चवर्णीय माणसांशी त्यांचे संबंध होते. तसेच उच्चवर्णीय माणलांच्या सहकार्यानं त्यांनी चवदार तळ्याचं आंदोलन केलं होतं. शेवटी ठरवलं गेलं की मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेबांना बनवावं. त्यानुसार पाच सदस्यांची नेमणूक करण्यात आली.
डॉक्टर बाबासाहेब संविधान लिहितांना रात्र रात्र जागत असत. त्यासाठी ते आपली पत्नी सविताशी चर्चा करीत. डॉक्टर बाबासाहेबांना उच्च रक्तचाप व मधुमेहाचाही त्रास होता. सवितामाई ह्या पेशानं डॉक्टर होत्या. त्या बाबासाहेबांच्या आरोग्याची तर काळजी घेत असत. नव्हे तर त्या संविधानाच्या कलमांवर बाबासाहेबांशी हितगुज करीत. नव्हे तर परामर्शही देत. दुस-या दिवशी डॉक्टर बाबासाहेब संसदेत एका एका मुद्यावर चर्चा करीत आणि त्या कलमांचा विषय पटवून देत.
आदल्या दिवशी विचार करुन सुचलेला विषय…… तसेच त्या विषयावर सविताशी झालेली चर्चा. त्यानंतर दुस-या दिवशी संसदेत घडलेली चर्चा यातूनच ते संविधान जन्मास आलं. जर सविता बाबासाहेबांना मिळाली नसती तर चित्र काहीसे वेगळे असते. बाबासाहेबही संविधान लिहिण्यासाठी जगले नसते. तसेच सक्षम असं संविधानही बनलं नसतं.असे म्हटल्यास आतिशयोक्ती ठरु नये. त्या पतीपत्नीच्यामुळे भारतीय संविधान संविधान बनलं. परंतू जास्तीत जास्त प्रमाणात डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेतलं जातं. कारण शिक्षण. डॉक्टर बाबासाहेब एवढे शिकले होते की त्यांना त्या काळात शिक्षणात कोणीही हरवू शकत नव्हते. सवितानं जरी त्यांना मदत केली असली तरी ती महिला होती. त्यावेळी तसंही महिलांना दुय्यमच स्थान होतं. ती जागलीही असेल संविधान बनवितांना. परंतू ती मसूदा समितीत नव्हती. विचार करा की आपल्याला जी कोणती गोष्ट करायची असेल. ती गोष्ट आपण एकटे करीत नाही. बहुतःश गोष्टीवर आपण आपल्या पत्नीचं सहकार्य घेतोच. व्यतिरीक्त आपलं आरोग्य आपलं जेवणखावण कोण सांभाळतं? आपली पत्नीच की नाही. प्रत्येक वेळी प्रत्येक प्रश्नावर सल्लाही आपली पत्नी देत असते.
संविधान लिहितांना जसा सविताचा डॉक्टर बाबासाहेबांना उपयोग झाला. तसा उपयोग मसुदा समीतीत असलेल्या इतर लोकांचा झाला नाही. ते बाकीचे चार सदस्य हे जरी मसुदा समितीत असले तरी त्यांनी कोणतंच कार्य केलं नाही. नाममात्र उपस्थिती दर्शवली. त्याचा साक्षीदार इतिहास आहे. संविधान हे बाबासाहेबांच्या(पतीपत्नीच्या) अथक प्रयत्नातून दोन वर्ष अकरा महिने व अठरा दिवसात बनलं. आज जे संविधान आपल्याला दिसते. ती देण बाबासाहेब पतीपत्नींचीच आहे.
थोडंसं मागं वळून पाहिलं तर या संविधानात रमाईचं योगदानही काही कमी नाही. राजरत्न जेव्हा मरण पावला. त्याच्या दुस-याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब विदेशात गेले. कशासाठी तर शिक्षणासाठी. त्या रमा नावाच्या तरुणीनं आपलं तरुणपण त्यागून नव्हे तर ज्याप्रमाणं सुभेदार रामजीनं बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी जो त्याग केला. तोच त्याग रमाबाईनंही केला. रमाबाईनं जर त्याग केला नसता. माझा पती पती म्हणत ती जगली असती. तर बाबासाहेब शिकले नसते व त्यांना संविधान लिहायलाही मिळालं नसतं. रमाईनं आपल्या हातावर आपली स्वतःची मुलं मरण पावतांना पाहिली. त्यांच्या औषधाला पैसा लावला नाही. परंतू बाबासाहेबांच्या शिक्षणाला पैसा लावला. ती राब राब राबली. एवढंच नाही तर ज्यावेळी चवदार तळ्याचं आंदोलन झालं. त्याचा खटला मुंबई हायकोर्टात सुरु असतांना ती सतत आजारीच राहात असे. पण तिनं आपलं आजारपण लपवलं. कारण कोर्टात पै पै पैसा लागत होता. त्यातच आजारपण एवढं वाढत गेलं की रमाबाई अल्पावधीतच मरण पावल्या. तिनं आपलं जगणं पाहिलं नाही. पण ज्या देशाला बाबासाहेब हवा होता. त्या देशाला बाबासाहेब देण्यासाठी नव्हे तर त्या देशातील बाबासाहेबाला जगविण्यासाठी तिनं आपलाच जीव धोक्यात घातला. ती लवकरच मरण पावली. पण डॉक्टर बाबासाहेबाला जगवलं. ती होती म्हणून बाबासाहेब जगले व पुढे संविधान लिहितो झाले.
आज आपण पाहतो की अशा त्यागातून बनलेलं संविधान. ज्या संविधानासाठी सविता राबली बाबासाहेब राबले. जिला संविधान निर्मीतीची कल्पनाही नव्हती.ती रमाई संविधान निर्मात्याला जगविण्यासाठीच नाही तर शिकविण्यासाठी राबली. त्या संविधानाची आज खिल्ली उडतांना दिसत आहे. जे संविधान ख-या अर्थानं देशाची देण आहे. ते संविधान आज काही लोकं कुचकामी ठरवत आहेत. संविधान बदलविण्याची भाषा करीत आहेत. सध्या तर या संविधानाला छेडछाड करता येत नाही. परंतू असंच जर सुरु राहिलं तर भविष्यात या संविधानाचं काय होईल हा प्रश्नच आहे.
आजमीतीला संविधान वाचविण्याची गरज आहे. संविधानानुसार चालण्याची गरज आहे. संविधानात कलमा जरी असल्या तरी गुन्हे वाढत आहेत. गुन्ह्याला लोकं घाबरत नाहीत. कारण कायद्याचं आज राज्य जरी असलं तरी त्या कायद्याच्या पळवाटाच भरपूर आहेत.
भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून आपण २६ जानेवारी दरवर्षी साजरा करतोय. याही वर्षी करणार आहोत. पण दरवर्षी ज्या पद्धतीनं साजरा केला जातो. विद्यार्थी असतात. प्रभातफेरी निघते. त्यानुसार यावर्षीचा प्रजासत्ताक दिन यावर्षीचा साजरा होणे नाही. कारण यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाला कोरोनाचे ग्रहण लागलेले आहे. अजूनही शाळा सुरु झालेल्या नाहीत.
महत्वपूर्ण गोष्ट अशी की प्रजासत्ताक दिन आपण दरवर्षी मोठ्या डौलात साजरा करतो. पण त्यानुसार वागतो का? ते संविधान टिकविण्याचा विचार करतो का? त्या संविधानाचा अपमान करणा-यांना कडक शिक्षा करतो का? त्यांना कधी अडवतो का? वा संविधानाला जपतो का? तर याचं उत्तर नाही असंच आहे. त्या इंग्लडमध्ये आजही संविधान अलिखीत असलं तरी अगदी शांततेत राज्यकारभार चालतो आणि या देशात लिखीत संविधान असूनही पायमल्ली. खरंच आज लिहिलेली राज्यघटना अाहे तरी ही अवस्था. जर हे संविधान लिहिलेले नसते तर या देशाची अवस्था कशी झाली असती. याची कल्पना न केलेली बरी.
आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे की आज संविधान आहे, म्हणून आपण सुरक्षीत आहोत. जर संविधान नसतं तर आपली अवस्था पशूसारखीच राहिली असती नव्हे तर काल मोगल, आर्य व इंग्रजांचे गुलाम होतो. आज इंग्रजांपासून स्वतंत्र्य झाल्यावर अजून कुणाचे गुलाम बनलो असतो. पुन्हा स्वतंत्र न होण्यासाठी……..म्हणूनच आज आपण सुधारायला पाहिजे. आपल्यासाठी नाही तर निश्चीतच आपल्या पुढे येणा-या भावी पीढींसाठी. ज्या पिढ्या आपल्या कर्तृत्वावर जगणार आहेत. नव्हे तर इतरांनाही जगवणार आहेत.
- अंकुश शिंगाडे
- नागपूर
- ९९२३७४७४९२