मंगरूळ दस्तगिर/प्रतिनिधी : पोलीस स्टेशन मंगरूळ दस्तगीर हद्दीतील गणपती मंडळे, ग्रामपंचायती,पोलीस पाटील आणि श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा राष्ट्रीय सेवा योजना पथक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात एकूण १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.मंगरूळ दस्तगीर येथील विठ्ठल रुक्मिणी संस्थान येथे ठाणेदार सुरज तेलगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर उत्साहात संपन्न झाले.कोरोना महामारीचा काळ आणि सध्या रक्तदानाची नितांत आवश्यकता लक्षात घेऊन सामाजिक जाणिवेतून मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज तेलगोटे यांनी मंगरूळ दस्तगीर हद्दीतील/गावातील गणपती मंडळे,ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, पोलीस पाटील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, शाळा/महाविद्यालय विद्यार्थी आणि नागरिक यांना विश्वासात घेऊन रक्तदान शिबिर आयोजनाचा संकल्प जाहीर केला.ठाणेदार साहेब यांच्या आव्हानांना परिसरातील नागरिक विशेषतः युवक-युवती यांनी भरभरून प्रतिसाद देत ग्रामीण भागात तब्बल एकशे पाच रक्तदात्यांनी रक्तदान करीत राष्ट्रीय कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
रक्तसंकलन जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती रक्तपेढी विभागाचे डॉ.ए.एस उखंडे डॉ.उमेश आगरकर डॉ. ऋतुजा मोहोड,डॉ.स्वाती रामटेके,स्मृती गायधने,मंगेश उमक यांच्या चमूने रक्तसंकलन केले. शिबीर यशस्वीतेकरिता मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी ,श्री संत शंकर महाराज कला महाविद्यालय पिंपळखुटा राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक स्वयंसेविका,कर्मचारी,विठ्ठल रुक्मिणी संस्थान चे सर्व पदाधिकारी,मंगरूळ दस्तगीर हद्दीतील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी,पोलीस पाटील विठ्ठल रुक्मिणी संस्थानचे सर्व पदाधिकारी युवक व युवती आदींनी अथक परिश्रम घेतले.
Related Stories
October 10, 2024